ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

रेंज रोव्हर सेंटीनेलमध्ये प्रवाशांच्या संरक्षणासाठी नवीनतम सुविधा

लॅण्ड रोव्हर स्पेशल व्हेईकल ऑपरेशन्सने आज आपल्या संरक्षित रेंज रोव्हर सेंटिनेलच्या नवीनतम व्हर्जनबद्दल माहिती दिली. रेंज रोव्हरचे हे व्हर्जन अधिक शक्ती, अद्वितीय सफाई, सर्व भूप्रदेशात चालण्याची क्षमता आणि प्रवासी संरक्षणाच्या नवीनतम सुविधांनी युक्त आहे.

३८०पीएस सुपरचार्ज्ड व्हीएट पेट्रोल इंजिनमुळे पूर्वीच्या व्हीसिक्स पेट्रोल इंजिनच्या तुलनेत ४०पीएस अधिक शक्ती गाडीला मिळाली आहे. यामुळे ही संरक्षित एसयूव्ही सर्व भूप्रदेशात उत्तम कामगिरी करेल याची खात्री झाली आहे. संरक्षक प्लेट व काचेचे एक टनाहून अधिक वजन वाहणारी सेंटिनेल १०.४ सेकंदात ०-१०० किलोमीटर प्रतितास एवढा वेग गाठेल (९.८ सेंकदात ०-६० किलोमीटर प्रतितास). गाडीची सर्वोच्च वेग मर्यादा १९३ किलोमीटर प्रतितास (१२०एमपीएच) असेल.

लॅण्ड रोव्हर स्पेशल व्हेईकल ऑपरेशन्सने डिझाइन आणि इंजिनीअर केलेली तसेच वॉर्कशायरमधील एसव्ही टेक्निकल सेंटरमध्ये बांधणी झालेली ही संरक्षित सेंटिनेल जागतिक दर्जाच्या आरामासह यात बसणाऱ्यांना सर्वोच्च दर्जाची सुरक्षा पुरवते. वाहनसुरक्षेच्या कठोर मानकांचे पालन करणारा तसेच बॅलिस्टिक व ब्लास सर्टिफिकेशन्सनुसार* तयार केलेला संरक्षण सेल म्हणजे या वाहनाचा गाभा आहे. आधुनिक व अपांरपारिक स्वरूपाच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी वाहनाच्या बॉडीचे इंजिनीअरिंग आणखी सुधारण्यात आले आहे. यामध्ये इम्प्रोव्हाइझ्ड एक्स्पोजिव डिव्हाइस (आयईडी) फ्रॅग्मेंटेशन ब्लास्ट्सचाही समावेश आहे.

लॅण्ड रोव्हर स्पेशल व्हेईकल ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक मायकल व्हॅन डेर सांड म्हणाले: “रेंज रोव्हर सेंटिनेलमध्ये नवीनतम रेंज रोव्हरच्या श्रेष्ठ दर्जाच्या सफाईदारपणाशी कोणतीही तडजोड न करता आमच्या व्हीआयपी ग्राहकांची अपवादात्मक दर्जाच्या संरक्षण व सुरक्षिततेची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. अधिक शक्तिशाली ५.०-लिटर सुपरचार्ज्ड व्हीएट इंजिनचा गाडीत करण्यात आलेला समावेश आणि अंतर्गत भागाचे नव्याने करण्यात आलेले डिझायनिंग यांमुळे कामगिरी व प्रवाशांची सुरक्षितता उच्च पातळीवर राहील याची खात्री करण्यात आली आहे.”

चेसिस, सस्पेन्शन, ब्रेकिंग आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी या सर्व प्रणाली लॅण्ड रोव्हरच्या पक्क्या रस्त्यावरील गतीशीलतेशी अनुकूल करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारची संरक्षित वाहने दाखवत असलेली कच्च्या रस्त्यांवरील अद्वितीय क्षमताही या गाडीमध्ये आहे. त्यामुळे खोल पाणी ओलांडणे आणि आव्हानात्मक भूप्रदेशांवरून सहजतेने प्रवास करणे या वाहनाला शक्य होणार आहे. खास तयार केलेल्या चाकांमध्ये रन-फ्लॅट प्रणालीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामुळे ही गाडी टायर नादुरुस्त होऊनही ५० किलोमीटरहून अधिक अंतर (३० मैलांपर्यंत) ८० किलोमीटर प्रतितास वेगाने कापू शकते.

गाडीत बसलेल्यांचे कोणत्याही हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सेंटिनेलमध्ये आर्मर्ड ग्लास बसवण्यात आली आहे. यापुढील सुरक्षितता प्रणालींमध्ये खास कन्फिग्युअर केलेल्या पुढच्या खिडकीचा पर्याय आहे. यामुळे काही कागद बाहेर टाकण्यासाठी कमाल १५० मिमी जागा मिळू शकते, त्याचप्रमाणे गाडीत बसलेल्यांना आपली सुरक्षित जागा न सोडता बाहेरच्या लोकांशी संपर्क साधण्याची मुभा देणारी पब्लिक अॅडरेस प्रणाली यात आहे. सायरन आणि आपत्कालीन लायटिंग पॅक्सही यात उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *