राजलक्ष्मी यांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत

कोल्हापूर: “कहो दिलसे मोदीजी फिरसे” या संकल्पनेतून प्रेरीत होऊन कर्नाटक येथील भाजपा कार्यकर्त्या राजलक्ष्मी या मोटार सायकल वरून जवळपास 15000 किमी प्रवास करून देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी पुन्हा 2019 मध्ये पंतप्रधान पदी विराजमान व्हावेत या हेतूने संपूर्ण देशात प्रचार व प्रसार करीत दिल्ली पर्यंत जाणार आहेत. कर्नाटक मधून सुरू झालेल्या प्रवासात आज त्या कोल्हापूर जिल्ह्यात आल्या होत्या. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मा. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणे गरजेचे असून याच उद्देशाने ही मोटार सायकल यात्रा सुरू करत असल्याचे राजलक्ष्मी यांनी नमूद केले.
यावेळी भाजपा महिला पदाधिकाऱ्यां हस्ते बिंदू चौक येथे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या. कायक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष श्री हेमंत आराध्ये यांनी तर आभार श्री मारुती भागोजी यांनी केले.
यावेळी सौ वैशाली पसरे, सौ किशोरी स्वामी, सौ रजनी भुर्के, सौ कोळी, गायत्री राऊत, सौ आसावरी जुगदार, सौ आशा रेणके, सौ विद्या बनछोडे, सौ संध्या तेली, श्रद्धा मेस्त्री, सविता पाडळकर, विद्या बागडी, राजश्री कोळेकर, चिनार गाताडे, दिलीप मित्रानी, आर.डी. पाटील, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, मारुती भागोजी, नचिकेत भुर्के, चंद्रकांत घाटगे, अप्पा लाड, सुरेश जरग, आशिष कपडेकर, गणेश चिले, प्रतिराज निकम, रविंद्र मुतगी आदींसह पदाधिकारी, कायर्कर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!