राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिला ऊसतोड मजुरांच्या ५५ कुटुंबांना आधार;तीव्र पाणी टंचाईचा परिणाम

कागल प्रतिनिधी (राजेंद्र पाटील )
सद्या सगळीकडे लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे पण दुष्काळाची तीव्रता किती गंभीर आहे याची जाणीव कोणालाच नाही.कागलच्या छ शाहू साखर कारखान्यांचे चेअरमन समरजित़सिंह घाटगे यांनी मात्र माणुसकीचे नाते जपत बीड भागातील ऊसतोड मजुरांच्या ५५ कुटुंबांना आधार दिला आहे.राजे समरजितसिंह घाटगे छ. शाहू महाराजांचे फक्त रक्ताचे वारसदार नसून त्यांच्या आचार व विचारांचे खरे वारसदार असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे.त्यांच्या या समाजसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कागलच्या छ.शाहू कारखान्याकडे ऊस तोडणीसाठी बीड,सांगोला,उस्मानाबाद,
सोलापुर,जत ,परभणी,भागातील हजारो कुटुंब येत असतात.शाहू कारखान्यात मार्फत ऊस तोड हंगाम सुरू असताना ऊस तोडणी मजुरांची राहणेची,पाण्याची व विजेची सोय मोफत केली जाते. ऊसाचा गळीत हंगाम संपलेनंतर हे मजूर आपापल्या गावाकडे निघून जातात.पण यावर्षी नाळवंडी व नागझरी या बीड भागातील गावामध्ये तीव्र दुष्काळ पडलेला आहे.अक्षरश: पिण्यासाठी पाण्याची सोय नाही.गावात पाण्याचा टँकर आला तरच पिण्याच्या पाण्याची तेवढी सोय केली जाते.मग जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय कशी करायची? असा मोठा प्रश्न त्यांचेपुढे उभा राहिला होता.गळीत हंगाम संपलेनंतर गाडीतळावर राहायचे तरी कसे? इतर ठिकाणी कोण राहू देणार?जनावरांची सोय कशी करायची?पाणी,वीज यांची सोय काय करायची?एवढ्या ५५ कुटुंबांची एकत्र कुठे व्यवस्था करायची?असे अनेक प्रश्न त्यांचेसमोर आ वाचून उभे होते.
अशा परिस्थितीत ऊस तोड मजुरांनी छ. शाहू कारखान्याचे चेअरमन राजे समरजित़सिंह
घाटगे यांची भेट घेतली.आपली अडचण सांगितली.त्यावर ताबडतोब राजेंनी सदर लोकांना कारखाना गाडीतळावर जागेसह वीज व पाण्याचीही सोय करून दिली.त्यामुळे बीड भागातील या ५५ कुटुंबातील १९८ स्त्री,पुरूष,व मुले यांचेसह १५५ मूक जनावरांचीही सोय झाली आहे.त्यामुळे ऊस तोड मजुरांच्या कुटुंबातील सर्वजण समाधानी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *