पावसाने चांगली उघडीप दिल्याने पुराचे पाणी ओसरायला सुरुवात

कोल्हापूर : पावसाने चांगली उघडीप दिल्याने पुराचे पाणी बऱ्यापैकी ओसरत आहे. आज दिवसभरात तुरळक प्रमाणात सरी कोसळल्या. त्यामुळे लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, सिपीआर-सोन्या मारुती चौक असे बरेच रोड सुरू झाले आहेत.
दरम्यान सांगली फाटा, तावडे हॉटेल ला अजूनही ४ ते ५ फूट रस्त्यावर पाणी आहे त्यामुळे कोल्हापुरात येणारे पुणे-कोल्हापूर, सांगली-कोल्हापूर, निपाणी/कागल-कोल्हापूर मार्ग अजूनही पूर्णपणे बंद आहेत.
शहरांतर्गत पुर परिस्थिती चांगली सुधारली आहे.
शहरामध्ये देखील व्हीनस कॉर्नर, हॉटेल पॅवेलीयन नजीक पेट्रोल पंप, खानविलकर पंप, गायकवाड वाडा येथे पाणी ओसरत आहे पण पूरस्थिती कायम.
पावसाने अशीच उघडीप दिली तर कोल्हापूर मध्ये प्रवेश करणारे मार्ग उद्यापर्यंत सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हायवे मार्गाने कोल्हापुरात येणाऱ्या वाहनधारकांनी आजतरी निघण्याचा अजिबात विचार करू नये कारण मार्ग सुरू जरी झाले तरी गेली ४-५ दिवस रस्त्यावरच थांबलेल्या सर्व छोट्या-मोठ्या वाहनांसाठीच खूप वेळ लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!