रेल्वे व महाराष्ट्र शासनाच्या महाभरतीसाठी विद्या प्रबोधनीमध्ये क्रॅश कोर्सचे नियोजन

कोल्हापूर : नुकतीच भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासनाने महाभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये रेल्वे (NTPC) व रेल्वे ज्यु.इंजिनियर या पदासाठी १ लाखापेक्षा अधिक जागा जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाभरती जाहीर केली आहे. या महाभरतीच्या पाश्वभूमीवर जास्तीत-जास्त विद्यार्थांना या नोकरीच्या संधीचा फायदा मिळण्याच्या अनुशंगाने विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये १ महिन्याच्या क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्सची सुरवात १२ एप्रिल २०१९ पासून विद्या प्रबोधिनी मध्ये करण्यात येणार आहे. अनुभवी तज्ञांकडून विद्यार्थांना सर्व विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्यामध्ये गणित (अंकगणित), बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान तसेच या परीक्षांसाठी आवश्यक सर्व अभ्यासक्रमांची तयारी करून सराव चाचणी सुद्धा अनुभवी तज्ञांकडून घेतली जाणार आहे. या महाभरतीसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी हि सुविधा माफक फी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.तरी महाभरतीसाठी उपयुक्त अशा या क्रॅश कोर्सचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *