पुण्यातील नर्चर मेरिट ने प्रवेश गुणांनुसार महाविद्यालये शोधण्यासाठी फ्री कट-ऑफ सॉफ्टवेर पोर्टल तयार

सीईटी, जेईई, नाटा आणि एनईईटी चे स्कोअर मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
सीईटी, एनईईटी, जेईई, इत्यादी सारख्या पदवी प्रवेश परीक्षा पास होणे कठीण असेल असे आपल्याला वाटत असेल, तर या परीक्षा पास झाल्यानंतर कोणत्या महाविद्यालयात आणि कोणत्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल, याचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. 5000 महाविद्यालये, 300 अभ्यास शाखा आणि लाखो विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत योग्य महाविद्यालय शोधण्यात तुमची जी दमछाक होईल, त्यापेक्षा शिक्षण सोडून देणे बरे, असे काहीसे आपल्याला वाटेल. पण आता होऊ नये, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मेरिट प्रमाणे कोणत्या विद्या शाखेत आणि कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल, हे शोधण्यासाठी पुण्यातील नर्चर मेरिट प्रायव्हेट लिमिटेड या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘स्टार्ट-अप’ ने www.MyCollegeCutoff.com हे फ्री कट-ऑफ सॉफ्टवेर पोर्टल तयार केले आहे. सीईटी , जेईई, नाटा आणि एनईईटी चे स्कोअर मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मार्क आणि इतर जुजबी माहिती टाकल्यावर लगेच महाविद्यालयांची यादी समोर मिळणार आहे. या महाविद्यालयांच्या मागील वर्षीच्या कट-ऑफ नुसार ही यादी तयार करून मिळते.

नर्चर मेरिट मेरिट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि मुख्य काउन्सेलर अनिश कुलकर्णी म्हणाले, “www.MyCollegeCutoff.com या पोर्टल द्वारे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, फार्मसी आणि आर्किटेक्चर महाविद्यालयांसह तसेच अखिल भारतातील एमबीबीएस, बीडीएस कॉलेज, तसेच जेईई परीक्षेच्या मार्कांवर प्रवेश देणारी महाविद्यालये, म्हणजे आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी निधी महाविद्यालयांप्रमाणे यांचा शोध देखील घेता येणार आहे. यातून मिळालेल्या यादीचा वापर करून प्रवेश प्रक्रियेमध्ये द्यावे लागणारे विकल्प थेट भरता येतील.” नर्चर मेरिट मेरिट प्रायव्हेट लिमिटेड ही भारताच्या ‘स्टार्ट-अप’ इंडिया प्रकल्पांतर्गत डीआयपीपी-मान्यताप्राप्त एड-टेक, म्हणजेच शिक्षण तंत्रज्ञान स्टार्ट-अप आहे. 75,000 कर्मचारी असलेली भारताची सर्वात मोठी इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनी असलेल्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री हणमंतराव गायकवाड यांनी या स्टार्ट-अप मध्ये ‘एंजल फंडिंग’ केले आहे. ही संस्था प्रामुख्याने करियर गायडन्स आणि कौन्सेलिंग क्षेत्रात काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!