पोलिस पथकावरील हल्यातील माजी उपमहापौर शमा मुल्ला,सलीम मुलासह गुन्ह्यांतील आरोपींना मोका

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात राजारामपुरी पोलिस स्टेशन हद्दीत यादवनगरमध्ये झालेल्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावरील हल्यातील मुख्य आरोपी सलीम मुल्ला ,माजी उपमहापौर शमा मुल्ला सह संशयित ४० आरोपींवर मोका(संघटीत गुन्हेगारी कायदान्वये)अंतर्गत कारवाई होणार असून तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे.अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी सायंकाळी राजारामपुरी पोलीस स्टेशन हद्दीत यादवनगरमध्ये मटक्यावरील छापा दरम्यान प्रशिक्षणार्थी अप्पर पोलिस अधिक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या सह त्यांच्या पथकावर हल्ला करून सुरक्षारक्षक निरंजन पाटील यांची सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने काढून घेत शर्मा यांच्यावर रोखल्याने माजी उपमहापौर शमा मुल्लासह २० जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.तर मुख्य आरोपी सलीम मुल्ला सह उर्वरीत आरोपींचा शोधा विविध पथकाद्वारे चालू आहे.दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना सदर घटनेतील चार आरोपी निलेश काळे,सलीम मुल्ला चा भाऊ राजू मुल्ला, सुंदर दाभाडे आणि जावेद मुल्ला लक्षतीर्थ वसाहतमध्ये जमून कोल्हापूर सोडण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सावंत यांच्या पथकाने त्या परिसरात शोध मोहीम सुरू केली असता सदर आरोपींनी पोलिसांना पहाताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र ऊसात लपून बसलेले आरोपी राजू मुल्ला, सुंदर दाभाडे यांना पोलिसांना पकडण्यात यश आले आले.तर जावेद मुल्ला पळून जाण्यात माहेर ठरला. तर पिस्तूल पळवून नेणारा निलेश काळेला ही अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पिस्टल व ५ राऊंड हस्तगत करण्यात आले.तर राजारामपुरी पोलिसांना अन्य आरोपी पिपू उर्फ सलमान मुल्ला यास अटक करण्यात यश आले.तसेच सदर गुन्ह्यामध्ये आज अखेर २५ जणांना अटक करण्यात आली असून छापा दरम्यान सलीम व शमा मुल्ला यांच्या घरामध्ये रोख (रोख रक्कम १लाख ३६हजार रुपये) रक्कमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यांतील अन्य आरोपींचा शोध विविध पथकामार्फत सुरू असून या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी माजी उपमहापौर शमा मुल्ला व सलीम मुल्लासह ४० संशयित आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात पोलिस खात्याकडून हालचाली सुरू झाल्या असून तसा प्रस्ताव वरीष्ठांकडे सादर करण्यात आला आहे अस पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.तर अवैध व्यवसायिकास वरदहस्त असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात येत असल्याच ही यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत ,पोलिस निरीक्षक सुनील पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *