पीएनजी ज्वेलर्स आपल्या सर्व दुकानांमध्ये फॉरएवरमार्क हिऱ्यांची विक्री करणार

ग्राहकांना अस्सल हिरे मिळावेत यासाठी धोरणात्मक भागीदारी –

पीएनजी ज्वेलर्स ब्रँड हा मूल्य आणि विश्वासाचे उत्तम उदाहरण असून त्यांचा नावीन्यतेवर ठाम विश्वास आहे. त्यांनी फॉरएवरमार्क या डी बिअर्स ग्रुपच्या हिरेब्रँडशी भागीदारी केली असून त्यांच्या भारतातील सर्व दुकानांमध्ये फॉरएवरमार्क हिऱ्यांची विक्री केली जाणार आहे.
जगातील सर्वाधिक काळजीपूर्वक निवडले जाणारे हिरे म्हणून फॉरएवरमार्कचे नाव आहे. तर आपल्या हिरे दागिन्यांमधील अचूकपणा आणि गुणवत्ता यासाठीपीएनजी ज्वेलर्स प्रसिद्ध आहेत. या दोन्ही ब्रँडच्या उत्तम भागीदारीने गेल्या काही वर्षात सर्वाधिक सुंदर, दुर्मिळ आणि खात्रीशीर स्रोतांमार्फत हिरे उपलब्धकरून देण्याचा मार्ग खुला झाल्याने अस्सल हिऱ्यांचे दागिने ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत.
ही भागीदारी अधोरेखित करण्यासाठी पीएनजी ज्वेलर्सने अतिशय सुंदर अशा फॉरएवरमार्क हिऱ्यांनी जडवलेली ‘फॅब 5’ नावाची वैशिष्ट्यपूर्ण मालिकाचतयार केली आहे. प्रत्येक हिऱ्यावर एक विशिष्ट क्रमांक कोरण्यात आला असल्याने आपल्याला अस्सल, नैसर्गिक आणि कृत्रिमरित्या तो घडवला गेला नसल्याचीहमी मिळते. या संग्रहात उत्कृष्ट अंगठ्यांचे सेट्स, इअरिंग्ज, पेंडंट्स, तन्मणी (मंगळसूत्र पेंडंट) आणि ब्रेसलेट्स हे दागिने अतिशय माफक दरात उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ गाडगीळ म्हणाले, “आमच्या सर्वच दुकानामध्येफॉरएवरमार्कसोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. फॉरएवरमार्कच्या काटेकोर हिरे निवड प्रक्रियेप्रमाणेच, पीएनजी दागिन्यांमधीलप्रत्येक दागिना हा अनेक परीक्षणांमधून जात असल्याने आम्ही आमच्या ग्राहकांना केवळ सर्वोत्कृष्टच हिरे दागिने देत असल्याची हमी मिळते. जगातीलहिऱ्यांपैकी 1 टक्क्यांहून कमी हिरेच फॉरएवरमार्कच्या निकषांत बसतात हे आम्हाला माहित आहे. तसेच आम्ही सर्वात जास्त सुंदर हिऱ्यांचे दागिने तयार करतअसल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या नवीन ‘फॅब 5’ कलेक्शनमध्ये आम्ही फॉरएवरमार्क हिऱ्यांचा वापर केला असल्याने आमच्या प्रत्येक दागिन्यांची चमक तर वाढली आहेच पणत्याचसोबत आमच्या ग्राहकांशी असलेले आमचे नाते आणि विश्वास जास्त दृढ देखील झाला आहे. या संग्रहातील दागिने हे खिशाला सहज परवडतील असेआहेत आणि दैनंदिन वापरासाठी यामध्ये पाच मुख्य दागिने आहेत.”

फॉरएवरमार्क इंडियाचे अध्यक्ष श्री. सचिन जैन म्हणाले, “पीएनजी ज्वेलर्ससोबत त्यांच्या सर्वच दुकानांमध्ये भागीदारी केल्याचा फॉरएवरमार्कला अभिमानआहे. ज्या विक्रेत्यांच्या मनात हिऱ्यांच्या बाबतीत आम्हाला वाटते तशीच उत्कट भावना आहे आणि ब्रँडचे अतिशयक काटेकोर व्यापार निकष, सामाजिक आणिपर्यावरणाच्या बाबतीत जे अतिशय प्रामाणिक आहेत त्यांच्याशीच आम्ही व्यापार सहयोग करतो. 187 वर्षांपेक्षा जास्त वारसा असणारे पीएनजी हे देशातीलएक सर्वाधिक प्रतिष्ठित ज्वेलर्स आहेत. फॉरएवरमार्कसाठी ही भागीदारी एक मैलाचा दगड आहे आणि पीएनजी ज्वेलर्ससोबत आम्हाला मजबूत नात्याचीअपेक्षा आहे. फॅब 5 कलेक्शन ही या नाते संबंधाची सुरुवात आहे.”

फॅब 5 कलेक्शन हे पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व दुकानांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी www.forevermark.com आणिwww.pngjewellers.com ला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!