प्लॅस्टिक कचरामुक्त मोहिम – स्वच्छता हि सेवा 2019 अंतर्गत शहराती प्रमुख मार्गावरुन रॅली

कोल्हापूर: केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्यावतीने दि. 11 सप्टेबर 2019 ते दि. 01 ऑक्टोबर 2019 या कालावधीत प्लॅस्टिक कचरामुक्त मोहिम (स्वच्छता हि सेवा 2019) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज महानगरपालिका, शहाजी महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, के.आय.टी कॉलेज, महावीर कॉलेज, आर्किटेक्ट असोसिएशन, क्रिडाई यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रमुख मार्गावरुन प्लॅस्टीक व स्वच्छतेबाबत प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत दसरा चौक येथून या रॅलीची सुरवात करण्यात आली. सदरची रॅली दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदु चौक, शिवाजी चौक, महानगरपालिका, सी.पी.आर.चौक मार्गे दसरा चौक या प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली. सदरची रॅली महानगरपालिका चौकात आलेवर उपस्थित सर्व विद्याथर्यांना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेची शपथ दिली. या रॅलीमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी-विदयार्थीनींनी प्लॅस्टिक टाळूया पृथ्वी वाचवूया, आपले शहर स्वच्छ व सुंदर शहर बनवूया अशा घोषणा दिल्या.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलतांना उपस्थित कॉलेजच्या विद्यार्थी-विदयार्थीनींना एक संकल्प करायला सांगितला. प्रत्येकाने किमान पाच लोकांना प्लॅस्टीक न वापरणेबाबत जागृत करा. त्यानंतर त्यांनी पुढे पाच लोकांना याबाबत जागृत करावे त्यामुळे आपले शहर नक्कीच प्लॅस्टीक मुक्त होईल. प्लॅस्टीक मुक्तीची सुरुवात महाविद्यालयापासून करुया. अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश मुर्तींचे विर्सजन होणार आहे. यावेळी हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करुया प्लॅस्टिकचा वापर आपण टाळूया. महानगरपालिकेच्या वतीने प्लॅस्टीक विरोधी मोहिम सुरु असून येथून पुढे ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे आयुक्तयांनी यावेळी सांगितले.
यावेळी पर्यावरण अधिकारी समिर व्याघ्रांबरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, क्रिडाईचे , आर्किटेक्ट असोसिएशनचे , विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, एकटी संस्था उपध्याक्ष संजय पाटील, अवनी जिल्हा प्रकल्प समन्वय जैनुद्दीन पन्हाळकर, शहाजी महाविद्यालय, विवेकानंद कॉलेज, के.आय.टी कॉलेज, महावीर कॉलेजचे एन.एस.एस. व एन.सी.सी.चे विध्यार्थी विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षिका, महापालिका आरोग्य कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!