पिंपरी चिंचवड क्राईम ब्रँचचे सहा. पोलिस आयुक्त आर.आर.पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

कोल्हापूर/प्रतिनिधी
स्वर्गीय कै.माजी गृहमंत्री आर.आर.पाटील(आबा) यांचे बंधू आणि नुकतेच कोल्हापूरहून बदली होऊन पिंपरी चिंचवड आयुक्तालय क्राईम ब्रँचच्या सहा.पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेल्या आर.आर.पाटील(तात्या)यांना पोलिस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल शासनामार्फत राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे.
आर.आर.पाटील(तात्या) यांची स्पर्धा परिक्षेत यश मिळवून सन १९८७साली पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.त्यानंतर त्यांनी मुंबई, कोडोली, जयसिंगपूर,कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी ठिकाणी सेवा बजावली. तर कोल्हापूरमध्ये शाहूवाडी विभागाचे डीवायएसपी म्हणून ही अंत्यत प्रामाणिकपणे उल्लेखनीय सेवा बजावली.तर एकूण ३२वर्षाच्या पोलिस दलातील सेवा कालावधीत उत्कृष्ठ कामगिरी बद्दल त्यांना ६४२बक्षिसे मिळाली आहेत.तसेच गुणवत्ता पूर्ण सेवेकरता तात्यांना २००६ साली राष्ट्रपती पोलिस पदक आणि पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. दरम्यान अशाच त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *