पिंपळगाव बुद्रुकचा हेल्पर “शरद” झाला पाेलीस “फाैजदार”

कागल/ प्रतिनिधी : कागल तालूक्यातील पिंपळगाव बुद्रूक येथील हेल्पर काम करणारा मजूर झाला पाेलीस फाैजदार . शरद साेनबा माने असे त्या पाेलीस फाैजदाराचे नांव आहे.
शरद माने यांने खुल्या गटातुन हे यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या एम् पी एस् सी परीक्षेत त्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली हाेती.त्यात ताे पास झाला आहे . त्याचा राज्यात अाठवा क्रमांक आला आहे .
शरद सोनबा माने या तरूणाने अतिशय खडतर जिवन जगत सहाय्यक पोलीस निरीक्षक झाला आहे . त्याने संपादन केलेले यश अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहें .कोणताही क्लास नाहीं ,घरी कोणी दिशा देणारे नाहीं. घरचे दारीद्र्य स्वतः अभ्यास करून त्याने हे यश संपादन केले आहे .
माने यांचे प्राथमीक शिक्षण पिंपळगाव बुद्रूक येथे तर माध्यमीक शिक्षण केनवडे येथे झाले . दहावीला फक्त ४५ % गुण ,बारावी नंतर दोन वर्षे पशुधन चा काेर्स केला. एक वर्ष थांबून कला शाखेत इतिहास विषयात पदवी घेतली . व एका कारखान्यात हेल्परचे काम सुरू केले .हे करत ~ करत त्याने हे यश संपादन केले आहे. त्याचे वडील एस टी ड्रायवर व आई गृहिणी आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शरद म्हणाला माझ्या यशामध्ये वडील ,आई ,गावकरी यांच्या बरोबरच मी काम करत आसलेल्या ठीकाणच्या सहकाऱ्यानी मला फार मोठे सहकार्य केले . मी जेथे काम करत होतो तेथील संबंधूतानी मला कामाबराेबर अभ्यास करण्यास मदत केली त्यांचे सहकार्य मी कधीच विसणार नाही . माझ्या कुटूंबात नातेवाईकामध्ये व संपुर्ण गावामध्ये कोणीही स्पर्धा परीक्षामध्ये नाही . अभ्यास कसा करायचा व कीती करायचा हेही मला माहीत न्हवते, फक्त स्वतः कष्ट करून हे यश मला मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *