लोकसहभागातून रंकाळा तलाव, समोर स्वच्छता मोहिम

कोल्हापूर/प्रतिनिधी :
कोल्हापूर महापालिका यंत्रणेद्वारे व लोकसहभागातून आज रंकाळा तलाव पुर्व बाजू, संध्यामठ परिसर, राजकूपर पुतळा परिसर, जुना वाशी नाका शाहू उद्यान नजीक व देशमूख सांस्कृतीक हॉल समोरील परिसरात श्रमदान मोहिमेअंतर्गत गाळ काढणे व स्वच्छता करणेची मोहिम राबविण्यात आली.
सकाळी 7.00 वाजले पासून महापालिकेचा सामान्य प्रशासन विभाग, रवका विभाग, आस्थापना विभाग, एलबीटी विभाग, परवाना विभागाकडील कर्मऱ्यांनी महापालिकेच्या यंत्रणेद्वारे स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते व नागरीक यांचे सहभागातून तांबट कमान सार्वजनीक गणेश विर्सजन कुंड, संध्यामठ परिसर, राजकूपर पुतळा परिसर, जुना वाशी नाका उद्यान नजीक व देशमुख सांस्कृतीक हॉल येथील परिसर स्वच्छता करणेचे व गाळ काढणेचे काम करणेत आले. प्रथमता तांबट कमान सार्वजनीक गणेश विर्सजन कुंड येथील पाणी उपसा करणेत आले. यावेळी या मोहिमेध्ये महिलानीही आपला सहभाग नोंदविला. यावेळी एक पोकलँन्ड, एक जेसीबी, दोन डंपर यांच्या सहाय्याने रंकाळा तलावातील 3 डंपर गाळ व 1 डंपर प्लॅस्टिक कचरा काढण्यात आला.
तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.4 कडील उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांचे मार्गदर्शन खाली डाँ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कसबा बावडा उद्यानाची स्वच्छता करणेत आली. यामोहिमे मध्ये विभागीय कार्यालय क्र. 4, उद्यानविभाग व आरोग्यविभाग 20 कर्मचारी व उद्यानामध्ये उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी व फिरणेसाठी येणा-या नागरीकांनीही उत्स्फुर्त पणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उद्यानातील 1 डंपर कचरा उठाव करणेत आला.
यावेळी सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर रचनाकार नारायण भोसले, एन.एस.पाटील, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, आस्थापना अधिक्षक सागर कांबळे, आरोग्य, पवडी विभागाचे एकुण 70 कर्मचारी/अधिकारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते व रंकाळा तलाव परिसरातील महिलानीही या मोहिमे मध्ये उत्सफुर्त सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!