पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुर्ण करण्यास पुरातत्वखात्याचे ना हारकत पत्र.

खा. संभाजीराजेंनी कोल्हापूरकरांना दिलेला शब्द पाळला.
कोल्हापूर/प्रतिनिधी- गेली अनेक वर्षे पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाचे काम रेंगाळले होते. गेल्या आठवड्यात पुरातत्व खात्याने सुरु असलेले पुलाचे काम बंद करण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभुमीवर आज संभाजीराजेंनी मुंबई येथे पुरातत्व खात्याच्या कार्यालयात बैठक बोलावली होती.
यामध्ये, गेल्यावर्षी ८जून२०१८,रोजी नँशनल मोनीमेंट आँथेरेटी यांनी शिवाजी पुलाचे काम पुर्ण व्हावे म्हणून कोपीटंट आँथेरेटी यांच्याकडे शिफारस केल्याचे निदर्शनास आले असता, कोपीटंट आँथेरेटी यांनी संरक्षित जागेच्या १००मीटर मधील जमिनी जिल्हाधिकारी कार्यालयाने ताब्यात घेऊन त्याची पुर्तता करणे आवश्यक असताना ती झाली नसल्यानेच काम बंद करावे म्हणून नोटीस पाठवल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही खात्यांच्या तांत्रिक आडचणींच्यामूळे कोल्हापूरच्या नागरिकांची गैरसोय होत असल्याचे खा. संभाजीराजेंनी निदर्शनास आणून दिले व दोन्ही खात्यांमध्ये समन्वय साधून पुलाचे काम पुर्ण करण्यासाठी पुरातत्त्व खात्याकडून नाहरकतीचे पत्र मिळावे यासाठी राजेंनी आग्रह धरला.
राजेंच्या या आग्रही भुमिकेमूळे पुलाच्या कामाला मंजूरी देण्याचे पत्र राजेंच्याकडे तातडीने सुपुर्त करण्यात आले.

ना हरकतीचे पत्र मिळाल्यामूळे पुलाचे काम सुरु राहण्यास आता कोणतीही आडचण नसल्याचे खा. संभाजीराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *