महापालिकेच्या वतीने गांधी जयंती निमित्त शहरात प्लॅस्टिक संकलन

कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोंबर रोजी 150 वी जयंती आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी शासनाच्या व महापालिकेच्यावतीने 1 ऑक्टोंबर 2019 ते 03 ऑक्टोबर 2019 या कालावधीत ʇप्लॅस्टिक मुक्तीʈ व ʇस्वच्छता हिच सेवाʈ अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली.
यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलतांना शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा संकलन करणा-या टिप्परवरील कर्मचाऱ्यांना सिंगल युज प्लॅस्टिक कॅरिबॅग घरोघरी जाऊन संकलन कराव्यात अशा सुचना आरोग्याधिकारी यांना दिल्या. तसेच सर्वाच्या श्रमदानातून गांधी मैदान, शहरातील सर्व बागा, अंबाबाई मंदिर परिसर, बिंदू चौक व पार्किंग परिसर, दसरा चौक पार्किंग परिसर, रंकाळा तलाव या ठिकाणी श्रमदान घेऊन प्लॅस्टिक संकलन करावे. तसेच या उपक्रमात शहरातील शाळा, हॉटेल, सामाजिक संस्था यांचा सहभाग मोठया प्रमाणात व्हावा यासाठी सर्वांचा सहभाग असावा. महापालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छता स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाटय स्पर्धांचे अयोजन करणेबाबत प्रशासन अधिकारी यांना सुचना दिल्या. या स्वच्छता मोहीमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळेमधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणेत येणार आहे. दिनांक 2 ऑक्टोंबर 2019 रोजी शहरातील प्रमुख मार्गावर रॅलीचेही आयोजन करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्यावतीने गांधी जयंती निमित्त सिंगल युज प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी शाहुपरी येथील ई-2 आरोग्य कार्यालय व बी वॉर्ड मंगळवार पेठ आरोग्य कार्यालय येथे कचरा संकलन केंद्र सुरु करण्यात येणार आहे. याठिकाणी नागरिकांनी आपलेकडे असणारा सिंगल युज प्लॅस्टिक जमा करण्यात यावे असे आवाहन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त धनंजय आंधळे, आरोग्यधिकारी डॉ.दिलीप पाटील, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, सचिन जाधव, आरोग्य निरिक्षक माधवी मसुरकर, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार, पर्यावरण अधिकारी अपेक्षा सुर्यवंशी, एम आय एस तज्ञ पुजा बनगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!