महापालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेश विर्सजन मिरवणुकीतील मंडळांना श्रीफळ अर्पण

कोल्हापूर :- महापालिकेच्यावतीने गुरुवार दि.12 सप्टेंबर 2019 रोजी अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विर्सजनाचे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील मंडपामध्ये महापौर सौ.माधवी गवंडी, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व सर्व पदाधिकारी/अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ, पान, सुपारी अर्पण करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना वृक्षारोपणाचे महत्व समजणेकामी रोपे भेट देण्यात येणार आहेत.
सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता महापालिकेच्यावतीने सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पवडी विभागाचे 250 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे 350 व इतर विभागाचे कर्मचारी, ट्रॅक्टरट्रॉली 70, डंपर 12, जे.सी.बी. 8, ऍ़ब्युलन्स 4 व पाण्याचे टॅकर 2 व विद्युत विभागाकडील बुम 2 अशी यंत्रणा सज्ज्य करण्यात आली आहे. याअंतर्गत मिरवणूक मार्गावरील सर्व रस्त्यांची डागडूजी करणेचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. निश्चित केलेल्या विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभी करण्यात येत आहेत. विसर्जन मार्गावरील सर्व अडथळे व अतिक्रमण काढण्यात येत आहे. मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरत असलेल्या झाडंाच्या फादयाही छाटण्यात आलेल्या आहेत. मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. पंचगंगा नदी घाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी बापट कॅम्प येथे अर्पन करण्यात येणाऱ्या गणेश मुर्ती संकलनाकरिता मंडप उभारण्यात आलेला आहे. इराणी खणीवर सार्वजनिक गणेश मुर्ती विर्सजनासाठी दोन जे.सी.बी.ची व्यवस्था ठेवण्यात आलेले आहेत. तसेच इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग करण्यात आले असून वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले आहे. मिरवणुक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.
आरोग्य विभागाकडून विर्सजन मिरवणुक मार्ग, विसर्जन स्थळ ठिकाणी साफसफाई करण्यात आली असून वैद्यकिय पथकनेमणेत आले आहे. अर्पण केलेल्या गणेशमुर्ती व निर्माल्य योग्य त्या ठिकाणी पोहचविण्यासाठी वाहतुक व्यवस्था व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरेकेटस् उभारणेत येत आहेत. तसेच या इमारतीजवळ धोकादायक असलेचे फलक लावणेत येत आहेत. नागरिकांनी अशा इमारतीच्या परिसरात अगर इमारतीमध्ये प्रवेश करु नये असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागामार्फत पंचगंगा घाट, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव व राजाराम बंधारा या विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवणेची व्यवस्था करण्यात आली आहे.
पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळीत वाढ झालेली आहे. मंगळवारी पाण्याची पातळी 39 फुट 9 इंच इतकी होती. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे ज्याठिकाणी गणेश विसर्जन होते त्याठिकाणी विसर्जन करणेस अडचणीचे ठरणार आहे. तरी सर्व सार्वजनिक मंडळांनी गणेशमुर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खणीमध्ये करुन महापालिकेस सहकार्य करावे. तसेच विसर्जन मिरवणूक शिस्तबध्द व डॉल्बीमुक्त करावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!