महापालिकेच्यावतीने श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांची जयंती साजरी

कोल्हापूर ता.04 :- श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज नविन राजवाडा येथील श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या पुतळयास आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, महापौर सौ.सरीता मोरे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, सौ.मधुरीमाराजे छत्रपती, श्रीमंत शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, नगरसेवक राजाराम गायकवाड, संजय मोहिते, अर्जुन माने, रत्नेश शिरोळकर, माजी नगरसेवक माणिक मंडलीक, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, आर. के. जाधव, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, परवाना अधिक्षक रामचंद्र काटकर, अँड. राजेंद्र चव्हाण, प्रणिल इंगळे, प्रसन्न मोहिते, बंटी यादव, न्यु पॅलेस सोसायटी, रमणमळा पत संस्था, मालोजीराजे पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *