डॉ. डी. वाय.पाटील ग्रुपतर्फे पूरग्रस्त वळीवडे गाव दत्तक

[25 लाखांची मदत देणार : डॉ. संजय डी. पाटील]

कोल्हापूर /प्रतिनिधी
डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे पूरग्रस्त वळिवडे गाव दत्तक घेण्यात आले असून या गावासाठी 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.
डॉ. पाटील यांनी वळीवडेचे सरपंच अनिल पंढरे, उपसरपंच प्रकाश शिंदे यांच्याकडे यासंदर्भातील पत्र तेजस पाटील यांच्या उपस्थितीत दिले.
कोल्हापूरात महापूराची परिस्थिती उद्भवल्यानंतर आमदार सतेज पाटील, सौ. प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील तसेच त्यांच्या सर्व सहकायांनी पूरग्रस्त भागात जावून लोकांना सुरक्षीत स्थळी हलविणे, त्यांना जेवण, ब्लँकेट, औषधे पुरविणे, स्वच्छता, पाणी पुरवठा, जनावरांना चारा यासाठी पुढाकार घेतला आहे. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या वतीने ठिकठिकाणी आरोग्य शिबीरे सुध्दा घेण्यात आली आहेत.
या मदतकार्याचा पुढील भाग म्हणून डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने करवीर तालुक्यातील वळीवडे गाव दत्तक घेतले आहे. गावातील जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत आवश्यकती सर्व मदत देण्यात येणार आहे. डी. वाय. पाटील संस्थेतील 30 जणांच्या टीमकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यास सुरवात झाली आहे. यासाठी कृती आराखडा राबविणार येणार आहे. या माध्यमातून, 30 जनांच्या टीम कडून पडझडींची पाहणी व नोंदणी करण्यात येत आहे. तसेच शासकीय मदतीबरोबर ग्रुपची मदतही सर्वांना मिळवून देणार आहे. घरगुती वीज पूर्ववत करण्यासाठी आर्थिक सहाय्य करुन वीज जोडणी करुन देण्यात येणार आहे. पिकांचा पंचनामा करण्यासाठी तत्परतेने सहकार्य तसेच शेतकयांना लागणारे सर्व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुरामुळे ज्या लोकांची सर्टिफिकेट्स हरवलेली आहेत, त्यांना पुन्हा ती काढून देण्यासाठी हातभार लावण्यात येणार आहे. ज्या मुलांचे शैक्षणिक साहित्य हरवले असेल त्यांना वह्या, पुस्तके, शाळेची बॅग, ड्रेस आदी साहित्य दिले जाईल. प्रत्येक कुटूंबाला 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्य तसेच जेवण करण्यासाठी लागणाया भांड्यांचा एक सेटही दिला जाईल. वैद्यकीय मदत व औषधोपचार याबरोबरच जागेवर पाहणी करताना निदर्शनास येणारी आवश्यक असणारी सर्व मदत दिली जाणार आहे.
यावेळी बोलताना, डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, आजपर्यंत प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये डी. वाय. पाटील ग्रुप मदतीसाठी अग्रेसर राहीला आहे. आज कोल्हापूरच्या भूमीतील लोक अडचणीत असताना त्यांच्यासाठी भरीव काहीतरी काम करण्याची आमची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो. त्यातूनच वळीवडे गावात आम्ही हा आराखडा राबविणार आहोत.
प्रास्ताविक डॉ. अरविंद मोहिते यांनी केले. तर आभार उपसरपंच प्रकाश शिंदे यांनी मानले. यावेळी प्रल्हाद शिरोटे, राजू वळीवडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, भगवान पळसे, विजय चौगले, विजय पाटील, प्रदीप झांबरे, सुहास तामगावे, बली खांडेकर, सचिन चौगले, बाजीराव माने, मधू माने, भैय्या इंगवले, बजरंग रणदिवे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *