ओमेगा ३ – कर्करोगी रुग्णांसाठी फॅटी ऍसिडट्युमरची वाढ थांबवणे आणि त्याला कमी करणे नसांच्या किंवा ट्युबच्या साहाय्याने उपचार

कोल्हापूर, २६ जुलै २०१९.- जगभरातील वैद्यकीय संशोधक ,वैज्ञानिक आणि आहार तज्ञ कर्करोग उपचारामध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडच्या भूमिकेचा अभ्यास करत आलेले आहेत.पोषणाचा एक अविभाज्य असणार भाग जो रुग्णांना निरोगी वजन,शक्ती राखण्यास,बॉडी टिशू निरोगी ठेवण्यास,आणि कॅन्सरचा दुष्परिणाम टाळण्यास उपचारादरम्यान आणि उपचारानंतरही मदत करतो.
कोल्हापूर ,अँपल सरस्वती हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉ.निखिल गुलवानी यांच्या नुसार ज्या कर्करोगी रुग्णांमध्ये कुपोषण आढळते जे कि मुख्यतः त्यांच्या उपचारामध्ये अडथळा आहे विविध उपचारांमधून जातात. कुपोषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांना अतिउच्च पोषणाची गरज भासते ती गरज ओमेगा ३ फॅटी ऍसिड पुरविते.निरीक्षणामध्ये असे आढळून आले कि, कर्करोगी रुग्णांना भूक लागत नाही या अवस्थेला अनोरेक्सिया म्हणतात ,ज्याची शक्यता रोगाच्या आधी किंव्हा कर्करोग झाल्यानंतर ही आढळतात. कर्कररोगींमध्ये अनोरेक्सिया हे सामान्य लक्षण आहे. आणि दुसरीकडे कॅशेक्सिया ह्या अवस्थेची लक्षणे दुबळेपणा, वजन कमी होणे ,स्नायू आणि चरबी मध्ये कमतरता असून पचनसंस्थेवरती प्रभाव सोडतात जरी तो रुग्ण नीट भोजन करत असेल तरी तो चरबी आणि स्नायूंला स्टोर करू शकत नाही. याचे कारण ट्युमरची झालेली अतिरिक्त वाढ होय .
अनेक क्लिनिकल स्टडीसमध्येदर्शविले आहे कि ओमेगा ३ – फॅटी ऍसिड कर्करोगींसाठी वरदान ठरले आहे , असे डॉ निखिल गुलवानी यांचे म्हणणे आहे.आपले शरीर ओमेगा ३ फॅटी ऍसिड निर्माण करू शकत नाही तर त्याला अन्नाच्या किंवा पूरक अशा माध्यमातून घेणे गरजेचे आहे.खर तर,ओमेगा ३ फॅटी ऍसिड हे रुग्णांना अनेकदा पॅरेंटरल पोषणाच्या (नसांद्वारा )आणि त्याचबरोबर इंटरल पोषणाच्या (ट्यूबद्वारा ) साहाय्याने देण्यात येते.ओमेगा ३ फॅटी ऍसिड रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि त्यांना सूजपासून बचावते.
ओमेगा ३ फॅटी ऍसिड ट्यूमर विकसित करणाऱ्या पेशींना आणि त्यांच्या प्रसारणाला घटविते आणि ट्यूमर सेल एपोप्टोसिसला वाढवून पेशी विभाजनाला प्रोत्साहन देते. डॉ गुलवानींच्या निष्कर्षावरून पोस्ट सर्जिकल कर्करोगी रुग्णांना दवाखान्यामध्ये कमी वेळ घालवावा लागणार आहे. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *