ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय राखून निवडणूक कामकाज करावे, अशी सूचना पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी केली. आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर,अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी, प्रांताधिकारी तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करून विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर म्हणाले,  प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था यासारख्या 8 सुविधा पुरविण्यात निवडणूक यंत्रणेने प्राधान्य द्यावे तसेच लोकसभा निवडणूकीसाठी निश्चित केलेल्या मतदान केंद्रांची निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदान केंद्रावर वश्यक सुविधा उपलब्ध केल्या असल्याची खात्री करावी, अशी सूचनाही विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रतिबंधक उपाययोजना यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रे, आचारसंहितेचे पालन, पुरेसा पोलीस फौज, होमगार्ड, एसआरपी, पुरेशी वाहने, आवश्यक असणारे स्कॉड, दैनंदिन अहवाल याची निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार वेळीच कार्यवाही करावी अशी सूचनाही विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी केली. यावेळी आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राबविण्यात येणारी निवडणूक प्रक्रिया, मतदान केंद्रावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा सुव्यवस्था, ईव्हीएम / व्हीव्हीपॅट याचे प्रशिक्षण अशा विविध बाबींचा यावेळी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी आढावा घेतला.या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, उपजिल्हाधिकारी अविनाश हादगल, जिल्हा पुरवठा अधिकारी .आर.माळी, प्रांताधिकारी संपत खिलारी, सचिन इथापे, अजय पवार, समिर शिंगटे,मनिषा कुंभार आणि विजया पांगारकर तसेच निवडणूक तहसिलदार शैलजा पाटील यांच्यासह नोडल अधिकारी महानगरपालीकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनंजय आंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, तहसिलदार सविता लष्करे, जिल्हा खणीकर्म अधिकारी अमोल थोरात तसेच
सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *