ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीचा डॉ. अरुणा माळींना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर/प्रतिनिधी
ओबीसी आरक्षण धोक्यात आणलेल्या राजकीय पक्षाच्या विरोधात ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समिती आवाज उठवत आहे. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण धोक्यात आलेच आहे.ते देशात येवू नये तर ओबीसी चळवळीचा आवाज दिल्लीत पोहचविण्यासाठी संघर्षशील आणि झुंजार असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी यांना ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला असून डॉ. अरुणा माळी यांना प्रंचड मताधिक्यांनी विजयी करावे. असे आवाहन ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीचे महासचिव प्रा.श्रावण देवरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
५२टक्के ओबीसींच्या निर्णायक मतावर निवडणून येणाऱ्या शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांनी मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण दिले आहे.तर धोबी, लोहार, सुतार, नाभीक, कुंभार ,अन्सारी, पिंजारी यासारख्या बलुतेदार -विश्वकर्मा जाती व वंजारा, वडार,पाथरवट ,धनगर यासारख्या भटक्या जमातींना म्हणजे लाभार्थी ओबीसींना देशोधडीला लावण्याचे काम काँग्रेस-भाजपा सरकारने केले असल्याचा आरोप प्रा.श्रावण देवरे यांनी केला. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवून ओबीसींची स्वतंत्र ताकद उभी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अरुणा माळी यांना ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला असून डॉ. माळी यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन प्रा.श्रावण देवरे यांनी पत्रकार बैठकीत केले.
पत्रकार परिषदेला शोभा देवरे,विठ्ठल तोडकर, सचिन माळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *