महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार

कोल्हापूर:- महानगरपालिकेतील दि.1 जूलै 2019 रोजी सेवानिवृत्त झालेले कर्मचा-यांचा महापौर सौ.माधवी गवंडी व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते छ.तारारणी सभागृहात फुले देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी फंडाच्या रक्कमेचे पत्रही संबंधीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बोलतांना महापालिकेच्या विविध पदावर काम करताता (सफाई ते अधिकारी) कर्मचारी सेवेतून सेवानिवृत्त झालेवर त्यांचा महापालिकेतून जाताना सत्कार होणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही चार महिनेपुर्वी हा सत्काराचा कार्यक्रम सुरु केला आहे. महापालिकेला प्रत्यक्ष फिल्डवर्क काम करणारा कर्मचारी महत्वाचा आहे. जयंती नाल्याची जी स्वच्छता मोहिम करण्यात येत आहे. त्यामध्ये महापालिकेचा सफाई, पवडी व इतर विभागातील कर्मचा-यांचा मोठा वाटा आहे. तो प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरुन काम करत आहे. स्वच्छतेमुळे आज पुराच्या पाण्याने धोका पातळी ओलांडून सुधा फारशी झळ शहराला झालेली नाही. त्यामुळे याचे सर्वश्रेय कर्मचा-यांना देतो. आता निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या तब्बेतीची काळजी घ्यावी. त्याच प्रमाणे आपण ज्या भागात राहत अहात तेथील बागेत सकाळी व्यायाम करा, प्रत्येक जण कामात राहिलेवर त्याची तब्बेतही व्यावस्थित रहाते असे सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी पंडीत निकम, संभाजी कांबळे, अशोक दाभाडे, रंगराव मोरबाळे, सदाशिव जाधव, रामेʉार थनवास, मालती कराळे, नामदेव कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, प्रॉ.फंड अधिक्षक उमाकांत कांबळे व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!