महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आज श्री.जोतिबा चैत्र यात्रेच्या निमित्ताने पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने आज श्री.जोतिबा चैत्र यात्रेच्या निमित्ताने पंचगंगा नदीघाट येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविणेत आली. यावेळी उपस्थित नागरीकांच्यावतीने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी बोलताना शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने प्रतिवर्षी अन्नदान छत्र मार्फत कार्यरत असून कोणत्याही प्लॅस्टिकचा वापर करत नसलेचे नमुद केले. पंचगंगा नदी घाट संवर्धन समितीच्यावतीने महेश कामत यांनी 4 दिवस ताक वाटप करणेत येत असलेचे तसेच प्लॅस्टिक पेले पुन्हा वापरत असलेचे सांगितले.या बद्दल महापालिकेचेवतीने आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
तसेच निसर्ग व आरोग्य याचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेची कास धरावी व पर्यावरण पुरक श्री.जोतिबा चैत्र यात्रेचे नियोजन केलेबद्दल आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्वांचे पुष्प देऊन कौतूक केले.
या मोहिमे अंतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचा-यानी पंचगंगा नदीघाट तसेच परिसराची स्वच्छता केली. यानंतर औषध फवारणी करुन डीडीटी पावडर मारण्यात आली. या माहिमेमध्ये महापालिकेच्या सुमारे 50 हून अधिक अधिकारी/कर्मचा-यांनी सहभाग घेतला. तसेच पंचगंगा नदीघाटावर उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी नागरीकांनीही उत्फुर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पंचगंगा घाटाची स्वच्छता केली असून कचरा उठाव करणेत आला आहे. तसेच संपूर्ण परीसरामध्ये कीटकनाशके तसेच टँकरव्दारे पाणी फवारणी करणेत आली आहे.
या मोहिमेमध्ये मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे व आरोग्य विभागाकडील 50 कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *