महापालिकेच्या पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर ता.13 :- महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास सार्वजनिक मंडळांनी प्रतिसाद देत 217 मुर्ती पर्यावरणपुरक अर्पण करण्यात आल्या. यामध्ये पंचगंगा नदी घाट (115), राजाराम बंधारा (71), कोटीतीर्थ तलाव व राजाराम तलाव (31), थेट इराणी खण विर्सजित (310) एकूण 527 मुर्ती पर्यावण पुरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास शहरातील अनेक मंडळांनी प्रतिसाद देवून गणेशमुर्ती अर्पण केल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे अभिनंदन करण्यात आले आहे.
यावेळी 1024 सार्वजनिक गणेशमुर्त्या विसर्जनासाठी आल्या. यापैकी 527 मुर्त्या अर्पण तर 497 (यापैकी 1 फायबर मुर्ती परत नेली) अर्पण केलेल्या मुर्त्या थेट इराणी खणीमध्ये विसर्जीत करण्यात आल्या. मागील वर्षी 1559 गणेशमुर्तीपैकी 334 मुर्त्या दान तर 381 (यापैकी 1 फायबर मुर्ती परत नेली) मुर्त्या थेट इराणी खणीमध्ये विसर्जीत करण्यात आल्या होत्या.
दरम्यान महापालिकेच्यावतीने अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विर्सजनाचे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील मंडपामध्ये महापौर सौ.माधवी गवंडी, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर भूपाल शेटे, अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगरसेवक/नगरसेविका व अधिकारी यांच्या हस्ते 295 मंडळांना श्रीफळ, पान, सुपारी अर्पण करण्यात आले. तसेच वृक्षारोपणाचे महत्व समजणेकामी सार्वजनिक गणेश मंडळांना रोपे भेट देण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, सौ.मधुरिमाराजे छत्रपती, माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडीक यांनी महापालिकेच्या पापाची तिकटी येथील मंडपास भेट दिली.
महापालिकेकडून सर्व विर्सर्जन ठिकाणी व विर्सजन मार्गावर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पुर ओसरल्यानंतर पंचगंगा घाटावरील गाळ युध्दपातळीवर काढून फायर फायटरने पाणी मारुन घाटपरिसराची व या येणा-य मार्गाची स्वच्छता करण्यात आली. यानंतर विर्सजन मिरवणूक गतीने सुरु झाली. तसेच रस्त्यांची डागडूजी करण्यात आली होती. अतिक्रमण व अडथळे हटविण्यात आले होते. तसेच विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. पंचगंगा नदी घाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी बापट कॅम्प येथे अर्पण करण्यात येणाऱ्या गणेश मुर्ती ठेवणेसाठी मंडप उभारण्यात आले होते. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग, वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले होते. मिरवणुक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. आरोग्य विभागाकडून विर्सजन मिरवणुक मार्ग, विसर्जन स्थळांची स्वच्छता करण्यात आली होती. वैद्यकिय पथकनेमण्यात आले होते. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरेकेटस् उभारण्यात आले होते. तसेच या इमारतीजवळ धोकादायक असलेचे फलक लावणेत आले होते. अग्निशमन विभागामार्फत पंचगंगा घाट, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव व राजाराम बंधारा या विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवणेची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी पवडी विभागाचे 250 कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे 350, फायरमन 30 व इतर विभागाचे कर्मचारी, ट्रॅक्टर 70, डंपर 12, जे.सी.बी. 8, ऍ़ब्युलन्स 4, पाण्याचे टॅकर-2, बोटी 4 व विद्युत विभागाकडील बुम 2 अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
आरोग्य विभागाकडून विर्सजन ठिकाणी दान केलेले 30 मे.टन. निर्माल्य डंपर 6 फेऱ्याद्वारे गोळा करणेत आलेले निर्माल्य वाशी येथे खत तयार करण्यासाठी एकटी संस्थेस महापलिकेच्यावतीने पोहच करण्यात आलेले आहे. अवनि व एकटी संस्थेमार्फ़त निर्माल्यांचे विलगीकरण करून खत करण्यात येत आहे. मिरवणूक संपलेनंतर मिरवणूक मार्ग स्वच्छ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!