महापालिकेतर्फे पंचगंगा घाट व रंकाळा तलावाची स्वच्छता

कोल्हापूर :- स्वच्छता अभियानाअंतर्गत कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदी जवळील रक्षा विसर्जन घाट, परिट घाट, मुख्य घाट, ब्राम्हण घाट या परिसराची महापालिकेच्या अग्निशमन विभाग व आरोग्य विभागामार्फत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली नियंत्रण अधिकारी तथा मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी राबविली.
तसेच रंकाळा तलाव पुर्व बाजूला एल.बी.टी विभाग व पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबविली. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली नियंत्रण अधिकारी तथा जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी राबविली. यावेळी घाटाच्या परिसरातून व रंकाळा तलाव परिसरातून 6 डंपर कचरा गोळा करण्यात आला.
यावेळी अधिक्षक प्रशांत पंडत, आरोग्य निरिक्षक श्रीमती शुभांगी पवार, स्थानक अधिकारी मनिष रणभिसे, ओमकार खेडकर, कांता बांदेकर, जयवंत खोत, महापालिकेच्या अग्निशमन, आरोग्य, एल.बी.टी व पाणी पुरवठा विभागाकडील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!