महापालिकेतर्फे जयंती नाल्यावर स्वच्छता मोहीम

कोल्हापूर/प्रतिनिधि :-
महापालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला स्वच्छ करणेचा निर्णय घेणेत आलेला आहे. आज महापालिकेच्या यंत्रणेद्वारे सकाळी 6:00 वाजले पासून संप व पंप हाऊस येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यापासून आयर्विन ब्रिज पर्यत नाल्यातील गाळ काढणे, जयंती नाल्याचे पात्र रुंदीकरण, परिसर स्वच्छ करणेत आला असून यावेळी पोकलॅन्ड 1, जेसीबी 2, डंपर 1, याचे सहाय्याने जयंती नाल्यातील अंदाजे 110 ते 120 डंपर गाळ व कचरा काढणेत आला. यामुळे जयंती नाला बंधा-यातील सांडपाण्याची क्षमता वाढणार असून जयंती नाला बंधा-यावरुन सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन पंचगंगा नदीचे होणारे प्रदुषणही कमी होणेस मदत होणार आहे. या मोहिमेमध्ये लोकांचा उत्स्फुर्त सहभाग व्हावा यासाठी शाळा व कॉलेज विद्यार्थी, तालीम व तरुण मंडळे, महिला बचत गट, शहरातील निरनिराळे असोशिएशन्स्, हॉटेल्स व्यावसायीक आणि नाल्याच्या दोन्ही तटावर रहाणारे रहिवाशी तसेच शहरातील जनतेनेही या मोहिमेमध्ये सहभागी होऊन स्वच्छतेस हातभार लावावा आणि जयंती नाला कधीही कचरा व प्रदुषण युक्त होणार नाही, यादृष्टीने जागरुक होऊन या उपक्रमात सहभागी व्हावे असे महापालिकेच्या वतिने अवाहन करणेत येत आहे.
यावेळी उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, शाखा अभियंता आर.के. पाटील, युनिस भेटेकर, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, विʉाा इंन्फ्रास्ट्रक्चरचे मॅनेजर पवनकुमार, आरोग्य निरिक्षक, ड्रेनेजचे सुमारे 100 अधिकारी/कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *