ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

महापालिकेच्यावतीने महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

कोल्हापूर ता.11:- महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, परवाना अधिक्षक रामचंद्र काटकर, अस्थापना अधिक्षक सागर कांबळे, विजय वनकुद्रे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र वेल्हाळ व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *