महापालिकेच्या स्वच्छता हीच सेवा मोहिमेचे कौतुक

कोल्हापूर :- स्वच्छता हीच सेवा मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अवहानानुसार पद्मावती मंदीर उद्यान परिसर ते रेणूका मंदीर चौक येथे श्रमदान मोहिम घेण्यात आली. या मोहिमे अंतर्गत आज सकाळी 7.00 ते 9.00 वाजेपर्यंत महापालिकेच्या पद्मावती मंदीर उद्यान परिसर येथे श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये उद्यानाची तसेच सभोवतालची स्वच्छता करणेत आली. या माहिमेमध्ये महापालिकेच्या अधिकारी/कर्मचा-यांनी सहभाग घेतला. तसेच उद्यानामध्ये उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी नागरीकांनीही उत्फुर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित नागरीकांनी उद्यानांविषयी बाजू मांडून महापालिकेने अशाच प्रकारे सर्व उद्यानांची स्वच्छता सेवा मोहिम राबवावी व उद्यानांनमधील कमतरतांची पुर्तता करुन घेणेसाठी नागरीकांचाही सहभाग घ्यावा अशी विनंती केली.
यावेळी नगरसेवक, उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, अनिल भंडारी, अरुण बारामते, आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य, पवडी, बागा व इस्टेट विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, जेष्ठ नागरीक महिला आदी उपस्थित होते.
तसेच महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा ड्रेनेज विभागाच्यावतीने जयंती नाला, बंधारा याठिकाणी शुक्रवार दि.17 मे 2019 सकाळी 6.00 वाजता जयंती नाल दसरा चौक येथे स्वच्छता मोहिम घेण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यान्वीत होणार असून समाजसेवी संस्था व नागरीक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *