महापालिका प्रशासनाने केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा:म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच केएमटी (परिवहन विभाग) च्या सर्व कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने सातवा वेतन आयोग लागू करावा.अशी प्रमुख मागणी म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या वतीने महापालिका प्रशासन, नगरसेवक, गटनेते यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर महापालिकेच्या केएमटी कर्मचाऱ्यांची युनियन ही महाराष्ट्र शासनाचे अनुचित कामगार प्रथा बंदी कामगार संघटना मान्यता कायदा १९७१ नुसार मान्यताप्राप्त युनियन आहे. तर युनियनने आज अखेर परिवहन विभागाकरिता सर्व करार व वाटाघाटी मान्यताप्राप्त संघटना म्हणून केलेली आहे. दरम्यान दिं.१९ जून २०१० साली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ६वा वेतन आयोग लागू करण्यास सर्वसाधारण सभेत मंजूरी होवून त्याची अंमलबजावणी झाली होती. त्यानंतर कोल्हापूर परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना २०१६साली ६वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता.तरी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत परिवहन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागे करावा.अशी मागणी म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या वतीने महापालिका प्रशासन, नगरसेवक, गटनेते यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी युनियनचे अध्यक्ष शशिकांत (प्रमोद)पाटील, उपाध्यक्ष अमर पाटील, जनरल सेक्रेटरी इरशाद नायकवडी, खजानीस निजाम मुल्लाणी,कार्याध्यक्ष राजेश ठोंबरे, मनोज नार्वेकर, रणजित पाटील, राजू महांगूरे यांच्या सह केएमटी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!