जाँर्जीयामध्ये सर्वात जास्त “भारतीय “

कोल्हापूर/प्रतिनिधी : जाँर्जीया हा युरोप खंडातील अत्यंत सुंदर, शांत,सुरक्षित आणि विविधतेने नटलेला देश असून या देशाचा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पहिल्या दहा देशामध्ये सातवा क्रमांक लागतो. तर जाँर्जीया मध्ये शिक्षण, सुरक्षितता तर सर्वसोयींयुक्त पोषक वातावरण आणि भारताबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे येथे सर्वात जास्त भारतीय लोक वास्तव्यास असल्याचे दिसून येते.
भारतापासून जवळजवळ सहा तासाच्या अंतरावर असलेल्या जाँर्जीया देशात राहणीमान चागले असून वातावरण ही सर्वांना पोषक आहे.त्यामुळे येथे निरोगी जीवन जगत आहेत.या देशाची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.तर नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये हे सिद्ध झाले आहे की इतर देशातील लोकांच्या तुलनेत जाँर्जीया मध्ये राहण्याची संख्या ही भारतीयांची जास्त आहे.येथील सुलभ वातावरण आणि आर्थिक दृष्ट्या देश सक्षम असल्याने येथे भारतीयांची स्थायिक होण्यासाठी पसंती वाढत आहे.तर महिलांच्या सुरक्षेबाबत या देशात कडक कायदा असून या ठिकाणी गुन्ह्यांची संख्या नगण्य आहे.
तर येथील लोकांचे विद्यार्थ्यांप्रती असणारे प्रेम व आपुलकी यामुळे विद्यार्थ्यांना रहाण्याची व जेवणाच्या सोयीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. आणि येथील भाषेची सक्ती नसल्याने भारतीय विद्यार्थी सहज रित्या त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी जाँर्जीयाला पसंती देत असून या देशात भारतासह परदेशात नावाजलेल्या विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटचे १२०० भारतीय विद्यार्थी वैद्यकीय एमबीबीएस शिक्षण घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!