आमदार सतेज पाटील यांनी खतांच्या वाढलेल्या किमतीसंदर्भात विधान परिषदेत वेधलं लक्ष

कोल्हापूर /प्रतिनिधी
राज्यात शासनानं खतांच्या किंमतीत प्रति गोणीमागे 110 ते 250 रूपयांपर्यत वाढ केल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र शासनाने अनुदान कमी केल्यानेच खतांच्या किमतीत वाढ झाली आहे काय? या किमती कमी करण्यासाठी कोणती कार्यवाही केली जात आहे असा प्रश्‍न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.
शासनाने खतांच्या किंमतीत प्रतिगोणी मागे 110 ते 250 रूपयांपर्यत वाढ केली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. केंद्र शासनाने अनुदान कमी केल्याने खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे का आणि या किमती कमी करण्यासाठी कोणती कार्यवाही केली किंवा केली जात आहे. असे प्रश्‍न आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत उपस्थित केले. कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी यावर उत्तर देताना खतांच्या किंमती वाढ झाल्याची कबुली दिली. रासायनिक खतांच्या विक्री किंमत 2009ते 10 पर्यत केंद्रीय खत सवलत योजनेतंर्गत केंद्र शासनामार्फत ठरविण्यात येत होत्या.केेंद्र शासनाने 1/04/2010 पासून खत अनुदान योजनेत बदल करून मूल्यद्रव्य आधारित अनुदान योजना सुरू केलेली आहे. तेव्हापासून केंद्र शासन दरवर्षी अन्नद्रव्यनिहाय अनुदान दर निश्‍चित करते. सदर योजनेत शासन प्रतिटन अनुदान दर निश्‍चित करून देते. असं सांगून अधितम विक्री मूल्य ठरवण्याचे अधिकारी केंद्र शासनानं उत्पादक कंपनीस असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!