आमदार राजेश क्षीरसागर ३ ऑक्टोंबर ला भगव्या रॅलीने उमेदवारी अर्ज सादर करणार

कोल्हापूर /प्रतिनिधी
हिंदूहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने गेली दहा वर्षे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कार्यतत्पर आमदार राजेश क्षीरसागर यांना पक्षनेतृत्वाने पुन्हा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भगवा फडकविण्याची संधी दिली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे आमदार राजेश क्षीरसागर उद्या गुरुवार दि.०३ ऑक्टोबररोजी सकाळी १० वाजता “पेटाळा मैदान” येथून भगव्या रॅलीने शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
               विलक्षण संघर्षातून शिवसेनेचा “आमदार” म्हणून राजेश क्षीरसागर यांनी ओळख निर्माण केली आहे. सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी “फक्त लढ म्हणा” अशी भूमिका ठेवून आमदार राजेश क्षीरसागर यांनी “सत्ता हे लोक सेवेचे मार्ग आहेत” हि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण जोपासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात आपले कार्य अखंडीत सुरु ठेवले आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक, आंदोलनात्मक, विकासात्मक आणि आरोग्य विषयक कामातून आमदार राजेश क्षीरसागर शहरवासियांचे हक्काचे आमदार बनले आहेत. सर्वच क्षेत्रातील नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भगव्या रॅलीने शहरातील वातावरण भगवेमय करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. या रॅलीची सुरवात पेटाळा मैदान, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी चौक येथे समाप्त असा असणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून या रॅलीची सांगता करणेत येणार आहे. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या भगव्या रॅलीत समस्त शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटना, आमदार राजेश क्षीरसागर प्रेमी आणि शहरातील तालीम संस्था आणि मंडळाचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने सामील होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!