MBBS साठी विद्यार्थ्यांची जाँर्जीयाला पहिली पसंती:विश्व

कोल्हापूर /प्रतिनिधी
आजच्या आधुनिक युगात शिक्षण ही काळाची गरज बनली असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जाऊन विविध क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.मात्र या स्पर्धात्मक काळात परदेशात जाण्यासाठी “जाँर्जिया” विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरत आहे.तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जाँर्जियामध्ये जाऊन आपले वैद्यकीय शिक्षण पुर्ण करताना दिसत आहे. त्यामुळे जाँर्जिया आता शिक्षणाची पंढरी म्हणून नावारूपाला आले आहे.
दरवर्षी १२ वी च्या निकालानंतर विश्व मेडिकल अँडमिशन पाँईटच्या वतीने १२ वी सायन्समधील विद्यार्थ्यांना परदेशातील MBBS शिक्षणाविषयीचे मोफत मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही देशाबाबतची MBBS शिक्षणाविषयीची माहिती अगदी सहज सोप्या पध्दतीने मिळते. दरवर्षी विद्यार्थी वेगवेगळ्या देशात MBBS कोर्स करण्यासाठी जातत. मात्र विश्व मेडिकल अँडमिशन पाँईट च्या तर्फे तज्ञांच्यामतानुसार यावर्षी विद्यार्थी जॉर्जिया या देशासाठी पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जाँर्जिया हा देश अत्यंत सुंदर, शांत आणि विविधतेने नटलेला देश आहे.महिलांच्या सुरक्षेबाबत या देशात कडक कायदा असून या ठिकाणी गुन्ह्यांची संख्या नगण्य असल्याचे पहावयास मिळत आहे. तर येथील लोकांचे विद्यार्थ्यांप्रती असणारे प्रेम व आपुलकी यामुळे विद्यार्थ्यांना रहाण्याची व जेवणाच्या सोयीसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. आणि येथील भाषेची सक्ती नसल्याने भारतीय विद्यार्थी सहज रित्या त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. तर येथील शिक्षण हे इंग्लिश मध्ये असल्यामुळे जाँर्जिया मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याचा कल भारतीय विद्यार्थ्यांचा असल्याचा पहावयास मिळत आहे. जाँर्जिया देश वैद्यकीय शिक्षणासह अन्य गोष्टींसाठी सर्व सोयिनयुक्त असल्याने भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी जाँर्जियास पहिली पंसती देत आहेत.
गेल्या २० वर्षापासून विश्व ही संस्था १६ शाखामधून हे काम करत आहे. दरवर्षी हजारों विद्यार्थ्यांना परदेशातील MBBS शिक्षणाविषयीचे मोफत मार्गदर्शन देवून डॉक्टर बनविण्याचे काम विश्व मार्फत केले जात आहे. विश्वच्या २० वर्षाच्या अनुभवामध्ये यावर्षी असे आढळून आले की जॉर्जिया या देशाला विद्यार्थी प्रथम पसंती देत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. कारण हा देश अत्यंत सुंदर, शांत व विविधतेने नटलेला देश आहे. जगातील १० सुरक्षित देशामध्ये याची गणना केली जाते. जगभरातील सर्वोच्च सुरक्षित देशांची यादी काढल्यास हा देश ६ व्या क्रमांकावार येतो. सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सुरक्षितता आणि क्राइम रेषो. या देशातील तिब्लीसी ही ०% क्राईम सिटी व १००% सेफ सिटी म्हणून जगभरात ओळखली जाते. या संपूर्ण देशाची लोकसंख्या ३५ लाख इतकी आहे. या देशामध्ये ६० टक्के लोक ख्रिश्चन समुदयाचे असून ४० टक्के लोक इतर समुदयाचे आहेत. जॉर्जिया हा देश ईस्ट यूरोपमध्ये गणला जातो.विशेष म्हणजे हदीतील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण याच देशामध्ये अधिक प्रमाणावर पहायला मिळते. या देशाची करन्सी लारी आहे. एक लारी म्हणजे आपले भारतीय २८ रुपये होतात. तेथे व्हिसा व मास्टर कार्ड कंपनीचे सर्व बँकांचे एटीएम चालते. तसेच वेळवेगळ्या ट्रॅव्हल कंपनीचे फॉरेक्स कार्ड सुध्दा चालते. हे फॉरेक्स कार्ड आपण आपल्या बॅकेच्या एटीएम कार्ड प्रमाणे वापरू शकतात. जॉर्जियामध्ये जॉर्जियन अमेरिकन युनिव्हर्सिटी, न्यू व्हिजन युनिव्हर्सिटी, तिब्लीसी ओपन युनिव्हर्सिटी अशा महत्वाच्या ३ युनिव्हर्सिटी आहेत. ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर जाणवते.
जॉर्जियामधील या तिन्ही युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्राचे ९०% विद्यार्थी आहेत. या कॉलेजमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोप-यामधील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या कॉलेजमध्ये ५ वर्षांचा (३६० क्रेडीट) अभ्यासक्रम आहे. या कॉलेजला MCI (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) आणि WHO ची मान्यता आहे. जी आपणा सर्वांंना अत्यंत गरजेची अशी आहे. त्याचबरोबर या युनिव्हर्सिटीमध्ये USMLE अभ्यासक्रम शिकविला जातो. हा USMLE जगभरामध्ये मेडिकल मधील सर्वाेत्कृष्ट अभ्यासक्रम मानला जातो. विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल नॉलेज मिळावे यासाठी या तिन्ही युनिव्हर्सिटीने हॉस्पिटल्स् विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. ही हॉस्पिटल्स् चेन असणारे हॉस्पिटल्स् आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्याधुनिक टेक्नॉलॉजीशी संबंध येवून त्याचे ज्ञान मिळविता येईल. या हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना डायरेक्ट पेशंट हाताळता येतात. त्याचबरोबर हॉस्टेल हे कॉलेज पासून १० मिनिटाच्या अंतरावर आहे जाण्या-येण्यासाठी विद्यार्थी मेट्रो व बसचा वापर करू शकतात. तेथे मासिक पास मिळतो. तो भारतीय रुपयाप्रमाण्ो ३०० रुपयांपर्यत मिळतो. मुला-मुलींची व्यवस्था वेगवेगळी आहे. दोघांच्या सुरक्षिततेसाठी सेक्युरिटी गार्ड उपलब्ध आहे. हॉस्टेलमध्ये विश्व ग्रुप तर्र्फे एक भारतीय व्यवस्थापक नेमलेला आहे. तो सर्व भारतीय मुलांची काळजी घेतो. दैनंदिन जीवनासाठी लागणा-या सर्व वस्तुु आपल्या हॉस्टेल समोर एक मॉल आहे तेथे मिळतात. सर्वात महत्वाचे म्हणजे दरवर्षी युनिव्हर्सिटीतर्फे भारतामध्ये येवून पालकांशी हितगूज व त्यांची मते जाणून विद्यार्थ्यांनाची प्रगतीवर चर्चा केली जाते.त्यामुळेच अनेक विद्यार्थी MBBS कोर्ससाठी जॉर्जियाला पसंती देत आहेत. विद्यार्थ्यांना जॉर्जियामधील शिक्षण घेवून डॉक्टर होण्याचे पूर्ण करायचे असल्यास ७०३०३०६६११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही विश्व मेडिकल अँडमिशन पाँइटच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!