मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांच्या विविध मागण्याचे समरजितसिंह घाटगे यांना निवेदन

कागल/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांना गृहनिर्माण सोसायटीची जागा द्यावी ,पत्रकारांच्या मुलांना नोकर्‍या आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये राखीव जागा असाव्यात ,मोफत एसटी पास, टोल फ्री या मुख्य मागण्यांसह पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना देण्यात आलय.
निवेदनात म्हटले आहे की राज्यपातळीवर काम करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदे शी संलग्न असणाऱ्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियामधील पत्रकारांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ, तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळाव्यात, पत्रकार संरक्षण कायदा,
पत्रकारांसाठी कायमस्वरूपी निवाऱ्याची सुविधा व्हावी, यासाठी हाऊसिंग सोसायटीची जागा उपलब्ध करून द्यावी, पत्रकारांना टोल फ्री पास सुविधा द्यावी, एसटी महामंडळाने ही मोफत पास ची सुविधा द्यावी. घरकूल योजनेचा लाभ दयावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे म्हणाले ग्रामीण भागातील पत्रकार सामाजिक सेवेच्या भावनेतून अत्यल्प मानधनावर काम करीत असतात. अशा वेळी अनेकांना संकटांना सामोरे जावे लागते. अधिस्वीकृती पत्रकारांची संख्या राज्यांमध्ये अत्यल्प आहे. त्याचे निकषही जाचक आहेत. हे निकष शिथिल करून सर्वांना अधिस्वीकृती पत्रकार म्हणून मान्यता द्यावी. तसेच पत्रकार भवनासाठी व पत्रकारांच्या हौसिंग सोसायटी साठी म्हाडाची जागा ही उपलब्ध करून द्यावी. हे स्पष्ट करून आपल्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या विविध मागण्या बाबत मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणावी. असे त्यांनी सांगितले.
दरम्यान समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकारांच्या मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. तसेच पत्रकारांच्या अडी अडचणी, समस्या, विविध मागण्या याबाबत मुख्यमंत्र्यांची निश्चित भेट घडवून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे, कौन्सिल मेंबर भास्कर चंदनशिवे, सुरेश कांबरे, कोर कमिटीचे सदस्य भाऊसाहेब सकट, बाळासाहेब चोपडे, अनिल तोडकर,कागल तालुका अध्यक्ष महादेव कानकेकर, प्रा. रविंद्र शिंदे, कार्याध्यक्ष सागर लोहार, सचिव समाधान म्हातुगडे, संघटक रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष संजय कांबळे, दत्तात्रय वारके, भुदरगड तालुका अध्यक्ष शिवाजी खतकर, संपर्क प्रमुख बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष नितीन बोटे, मोहन पाटील, संदीप पाटील, प्रशांत साठे , प्रकाश खतकर,रविंद्र देसाई,प्रकाश नाईक, राजेंद्र चव्हाण,मनोज हेगडे, फारूक मुल्ला, अशोक ससे, नरेंद्र बोते, तानाजी पाटील, विठ्ठल मोहिते, अविनाश पाटील, अवधूत मुसळे, प्रमोद परीट, बसगोंडा कडेमणी,आदींसह कागल तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *