मेकर ग्रुप इंडिया विरोधी कृतीसमीतीचे अडीच लाख नागरिक लोकसभा निवडणूकीवर टाकणार बहिष्कार:नाथाजीराव पोवार

आर्थिक फसवणूकीचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची कृतीसमितीची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ हजार ठेवीदारांना मेकर ग्रुप इंडिया कंपनीने ५६कोटी४४लाखांचा गंडा घालून केलेल्या आर्थिक फसवणूकीच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेकडून आज अखेर एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसून तपासात दिरंगाई होत असल्याने सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी मेकर ग्रुप इंडिया विरोधी कृतीसमितीच्या वतीने अध्यक्ष नाथाजीराव पोवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तर सदर प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करून पाच महिने होत आले तरी कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेल्या गोरगरीब हजारो ठेवीदारांना न्याय मिळत नसल्याने ४५हजार ठेवीदारांसह त्यांचे कुंटुबींय मिळून २लाख ५०हजार नागरिक येणाऱ्या लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा कृती समितीच्या वतीने नाथाजीराव पोवार यांनी यावेळी बोलताना दिला.
मेकर ग्रुप इंडिया कंपनीमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ हजार ठेवादारांना विविध माध्यमातून भुलभूलया करून ५६कोटी ४४लाखांचा गंडा घालून कंपनीचे १८संचालक फरार झाले. त्याच्याविरोधात मेकर ग्रुप इंडिया विरोधी कृती समितीच्या वतीने दिं.८डिसेंबर २०१८रोजी मेकर ग्रुप इंडिया कंपनीविरोधात शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये रितसर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदरचा गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान पोलिस निरीक्षक कदम यांनी यासंदर्भात शाहू स्मारक भवन येथे ठेवीदार आणि एंजटांचा मेळावा घेऊन दोषींवर कारवाई करून फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे पैसे वसूल करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली.मात्र आज अखेर पाच महिने होत आले तरी या प्रकरणातील१८आरोपी पैकी आज अखेर एकाही आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नसून तपासकामी दिरंगाई होत असल्याच निदर्शनास यैत आहे.तर हजारो ठेवीदारांचे संसारच रस्त्यावर आले आहे.सदर प्रकरणाच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेकडून दिरंगाई होऊन तपासात प्रगती होताना दिसत नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या हजारो ठेवीदारांना आर्थिक गुन्हे शाखेकडून न्याय मिळण्याची शक्यता दुसर असल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी पत्रकार बैठकीत मेकर ग्रुप इंडिया विरोधी कृतीसमितीच्या वतीने करण्यात आली. तर आज अखेर सदर प्रकरणी फसवणूक झालेल्या हजारो ठेवीदारांना न्याय मिळत नसल्याने ४५हजार ठेवीदारांसह त्यांचे कुंटुबींय मिळून दोन लाख ५०हजार नागरिक येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी कृतीसमितीने पत्रकारांशी बोलताना दिला.
पत्रकार परिषदेला विजय रणसुभे, दशरथ रणदिवे, द्वारापाल माणगावे, सुरेश कुलकर्णी, भुवनेश्वरी तोडकर, सविता जाधव यांच्यासह कृतीसमीतीचे पदाधिकारी, ठेवीदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *