महावितरणला राधानगरी वीज उपकेंद्र सुरू करण्यात यश

कोल्हापूर/प्रतिनिधी
शनिवारपासून राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्ठी झाल्याने भोगावती नदीला आलेल्या पुरात महावितरणच्या राधानगरी उपकेंद्राला येणाऱ्या 33 वीज वाहिनीचे खांब वाहून गेले. त्यामुळे राधानगरी शहरासह परिसरातील काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. धरणातील विसर्ग कमी होताच वीज कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत नवीन चार खांब उभारुन बिद्रीवरुन वीजपुरवठा सुरू करण्यास यश मिळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *