ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 24 मार्च रोजी शहरातील 56 उपकेंद्रावर परीक्षा

कोल्हापूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 24 मार्च 2019 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत शहरातील 56 उपकेंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.
या परीक्षेसाठी 18 हजार विद्यार्थी बसणार आहेत. आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे, अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक /भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *