महापालिकेच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली

कोल्हापूर ता.06 :- राजर्षि शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिका व जिल्हा प्रशासनाचेवतीने आज दसरा चौक येथील राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळयास महापौर सौ.सरीता मोरे व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली. यावेळी प्र. कुलगुरु डॉ. डि.पी.शिर्के, डॉ.जयसिंगराव पवार, जिल्हापुरवठा अधिकारी डॉ. रुणा काटे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे कादर मलबारी, शाहू स्मारक व्यवस्थापक कृष्णाजी हारुगडे, युवराज कदम, डॉ.अशोक चौसाळकर, प्र. जनसंर्पक अधिकारी विजय वनकुद्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *