स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या रेंज रोव्‍हर वेलारच्‍या विक्रीस शुभारंभ

भारत: जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या रेंज रोव्‍हर वेलारच्‍या विक्रीच्‍या शुभारंभाची घोषणा केली. भारतात या कारची किंमत ७२.४७ लाख रूपयांपासून आहे. २.० लिटर पेट्रोल (१८४ केडब्‍ल्‍यू) आणि २.० लिटर डिझेल (१३२ केडब्‍ल्‍यू) या दोन पॉवरट्रेन्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या वेलारमध्‍ये सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्ये व आकर्षकतेचा सुरेख संगम आहे. वेलारचे स्‍थानिक पातळीवरील उत्‍पादन आता जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाला भारतीय लक्‍झुरी एसयूव्‍ही विभागामधील स्‍पर्धेमध्‍ये वरचे स्‍थान प्राप्‍त करून देण्‍यामध्‍ये सहाय्य करेल.

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल) अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले, ”२०१८ मधील सादरीकरणापासून रेंज रोव्‍हर वेलारला देशभरातील ग्राहकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. आता स्‍थानिक पातळीवर उत्‍पादित करण्‍यात आलेल्‍या रेंज रोव्‍हर वेलारच्‍या सादरीकरणासह आम्‍ही हे आयकॉनिक, पुरस्‍कारप्राप्‍त उत्‍पादन आकर्षक व वाजवी दरामध्‍ये सादर करत आहोत. यामुळे भारतातील रेंज रोव्‍हरच्‍या अधिकाधिक चाहत्‍यांना या आकर्षक, लक्षवेधी आणि वैशिष्‍ट्यपूर्ण वेईकलचे मालक होण्‍याची आणि ड्राइव्‍ह करण्‍याची संधी मिळेल.”

अधिक आकर्षक

रेंज रोव्‍हर वेलारच्‍या प्रमाणांमध्‍ये बदल करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून ऑटोमोटिव्‍ह सुधारणा, आकर्षकता व आधुनिकता दिसून येते. वेईकलच्‍या पुढील बाजूस असलेले शक्तिशाली व्‍हॉल्‍युम्‍स, ड्रायव्हिंग करताना उत्‍तम व्हिजिबिलिटी, सावधनतेचा इशारा देणारे वेस्‍टलाइन आणि सुरेखरित्‍या तयार करण्‍यात आलेले रिअर यामधून वेलारमधील सर्वोत्‍तम रेंज रोव्‍हर लाइनेज दिसून येते. रेंज रोव्‍हर वेलारची डिझाइन वैशिष्‍ट्यपूर्ण आहे. यामध्‍ये ऑल-एलईडी लाइट्स, डिप्‍लोएबल फ्लश डोअर हँडल्‍स आणि बाहेरील बाजूस एकीकृत रिअर स्‍पॉइलर अशी सर्वोत्‍तम वैशिष्‍ट्ये आहेत. ही सर्व वैशिष्‍ट्ये एकत्रित वेलारला आकर्षक डिझाइन देतात, ज्‍यामधून सुधारित ऐरोडायनॅमिक कार्यक्षमता दिसून येते.

तंत्रज्ञानासह अधिक सक्षम

इंटीरिअर्समध्‍ये क्रांतिकारी टच प्रो ड्युओ तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान वेलारमधील लक्‍झुरी व इनोव्‍हेशनची खात्री देते. तसेच या हाय-टेक तंत्रज्ञानामध्‍ये अधिक भर करत आहेत दोन एकसंधीपणे एकीकृत केलेले २५.४ सेमी (१० इंची) टचस्क्रिन्‍स आणि दर्जात्‍मक किमान कंट्रोल्‍स. इंटरअॅक्टिव्‍ह ड्रायव्‍हर डिस्‍प्‍ले ड्रायव्हिंगसंदर्भात व्‍यापक माहिती आणि सक्रिय सेफ्टी डेटा देते. ते फुल स्क्रीन मॅप, तसेच फोनचा वापर आणि इतर मीडियावरील कंट्रोलची सुविधा देखील देते.

या वेईकलमध्‍ये लँड रोव्‍हरचा कोणत्‍याही स्थितीमध्‍ये उत्‍तम क्षमता देण्‍याचा लक्‍झुरीअस वारसा आणि अत्‍याधुनिक ऑल टेरेन प्रोग्रेस कंट्रोल (एटीपीसी) सिस्‍टम आहे. ही सिस्‍टम ड्रायव्‍हरला दलदलीसारखे घसरडे रस्‍ते, ओले गवत आणि बिकट रस्‍ते अशा आव्‍हानात्‍मक परिस्थितींमध्‍ये गतीवर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत करते. यामुळे उत्‍तम नियंत्रणासह सुधारित लक्‍झुरीअसची खात्री मिळते.

अधिक लक्‍झुरीअस

रेंज रोव्‍हर वेलारच्‍या इंटीरिअर डिझाइन रचनेमध्‍ये प्रबळ, आकर्षक हॉरिझॉन्‍टल लाइन्‍सचा समावेश आहे, ज्‍यामध्‍ये हाय-टेक वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे. कन्फिग्‍युरेबल अॅम्बिएण्‍ट इंटीरिअर लाइटिंग, स्‍लाइडिंग पॅनारोमिक रूफ, फोर झोन क्‍लायमेट कंटोल आणि एलीव्‍हेटेड स्‍पोर्टस् कमांड स्थिती ही वैशिष्‍ट्ये ड्रायव्हिंगचा अनुभव वाढवतात. अॅक्टिव्हिटी की रिस्‍टबँड सुलभ उपलब्‍धतेची खात्री देते, ज्‍यामुळे कन्‍वेन्‍शनल की फॉब सोबत घेऊन जाण्‍याची गरज नाही.

रेंज रोव्‍हर वेलारबाबत अधिक माहिती www.landrover.in येथे उपलब्‍ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!