LIC मधील महाभारतीच्या तयारीसाठी विद्याप्रबोधिनीमध्ये Test Series चे नियोजन

कोल्हापूर : LIC मध्ये नुकतीच “सहाय्यक” या पदासाठी ८००० जागांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये कोल्हापूर विभागासाठी ९२ जागांचा समावेश आहे. इन्श्युरन्स क्षेत्रात करीअर करू इच्छिणा-यांसाठी हि एक मोठी संधी आहे. LIC मध्ये “सहाय्यक” या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १ ऑक्टोबर असून यासाठी २१ व २२ ऑक्टोबर रोजी LIC मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेचे पूर्ण स्वरूप समजून घेण्यासाठी विद्या प्रबोधिनी मध्ये ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच LIC च्या या परीक्षेची पूर्ण तयारी करून घेण्यासाठी दिनांक ७ ऑक्टोबर पासून विद्या प्रबोधिनीमध्ये Test Series चे आयोजन करण्यात आले आहे. हि टेस्ट सिरीज अत्यल्प दरात म्हणजेच रु.१००/- मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे ज्यामध्ये ९ टेस्ट चे नियोजन असून ६ ऑफलाईन व ३ ऑनलाईन टेस्ट घेतल्या जातील तसेच त्याचे लगेचच अनुभवी प्राध्यापकांकडून सखोल विश्लेषण केले जाणार आहे.

तरी LIC परीक्षा मार्गदर्शन चर्चा सत्र व टेस्ट सिरीजचा लाभ जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!