खिद्रापूरात श्रमिक विकास संघाचे निवासी कार्यकता शिबीर संपन्न

इचलकरंजी,(प्रतिनिधी)-
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात नमूद असलेली स्वातंत्र्य,सार्वभौमत्व, संघराज्यीय, एकात्मता, धर्मनिरपेक्षता,समाजवाद आणि संसदीय लोकशाही हि मुल्ये म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट सामजिक दस्तऐवज असलेल्या भारतीय संविधानाचा गाभघटक आहेत.आज त्या मुल्यांवरच पद्धतशीर हल्ले केले जात आहेत. घटना बदलण्याची जाहीर भाषा केली जात आहे आणि देशाला पुन्हा मनुस्मृतीच्या काळात नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत ते ओळखून त्या विरोधात संघटीत लढा देण्याची प्रत्येक समतावादी व्यक्तीची आणि काळाची गरज आहे.त्यासाठी कार्यकर्ता प्रबोधन शिबिरे उपयुक्त ठरतात असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.श्रमिक विकास संघाच्या दोन दिवसीय कार्यकर्ता प्रबोधन शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ आप्पा पाटील होते.स्वागत व प्रास्ताविक कॉ.जयश्री पाटील यांनी केले.या दोन दिवसीय शिबिरात मा.कॉ.शाहीन शेख(सांगली)यांनी माहितीचा अधिकार व रेशनचाकायदा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले,तसेच डॉ.अरिहंत मगदूम यांनी स्त्रियांचे आजार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.सायंकाळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन कोल्हापूर शहर शाखेच्या वतीने “ऐसे कैसे झाले भोंदू’’ या विषयावर लघु नाटिका सादर केली.शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मियाखन मोकाशी,दिपक सोलापुरे,राफिया मुल्ला,वासिम मकानदार,रोहिणी दानोळे,शिवानी भस्मे,पल्लवी लाले, सुरेखा परीट,सुजाता गुरव,दिपाली खोत,सुमन शिरगावे यांनी विशेष परिश्रम घेतले.निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिरात शंभरावर महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.तसेच उपस्थित शिबिरार्थीनी सायंकाळी नौका विहारचा आनंद घेतला प्रियांका मस्कर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *