कोल्हापूरात यशवंत भालकरांचा चित्रपट जीवनप्रवास १७ एप्रिलला “गुरुवंदना” कार्यक्रमातून उलघडणार

कोल्हापूर/प्रतिनिधी
गेली ५०वर्ष चित्रपटसृष्टीत अधिराज्य केलेले कोल्हापूरचे भूषण प्रतिभावंत जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचा चित्रपट जीवनप्रवास दिं.१७एप्रिल रोजी सायंकाळी ५.३०वा.कोल्हापूरात केशवराव भोसले नाट्यगृहात “गुरुवंदना” कार्यक्रमातून “यसबा एक झुंझार वादळ”या माहितीपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून गुरुवंदना या कार्यक्रमाची मूळ संकल्पना दिंवगत कै.जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकरांचीच होती. अशी माहिती भालकर्स कला अकादमीचे संग्राम यशवंत भालकर आणि सपना जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सातासमुद्रापार चित्रपटसृष्टीत नाव गाजवले कोल्हापूरातील चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर दिं. १९ डिसेंबर २०१८रोजी काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी पोरकी झाली.त्यांचे चित्रपटसृष्टीत अमर कार्य आहे.त्यामुळे यशवंत भालकर यांचा संपूर्ण चित्रपट जीवन प्रवास भालकरांच्या जन्म दिनी दिं.१७एप्रिल रोजी” गुरुवंदना” या कार्यक्रमातून “यसबा एक झुंझार वादळ”..या माहितीपटाद्वारे दाखविण्यात येणार आहे. तर या माहिती पटाचे लेखन पत्रकार आश्विनी टेंबे तर मांडणी व दिग्दर्शन संग्राम भालकर यांनी केले असून निवेदन स्वप्निल राजशेखर ,संकलन सैफ इम्तियाज बारगीर यांनी केले आहे .तसेच नेपत्य वैभव भोगटे व प्रकाश योजना सुनील घोलपडे यांची असणार आहे. दरम्यान जवळपास ६०ते७० कलाकारांचा समूह आपल्या कलेतून यशवंत भालकरांना गुरुवंदना बहाल करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कर उपायुक्त एमडी चित्रनगरी कोल्हापूर संजय पाटील, जेष्ठ लेखक व अ.भा.चि.महामंडळाचे अध्यक्ष भास्कर जाधव ,जेष्ठ दिग्दर्शक व अ.भा.चि.महामंडळाचे संचालक सतिश रणदिवे, माजी नगरसेवक आदिल फरास असणार आहेत. या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील विविध मान्यवर निर्माते ,छायाचित्रकार,गीतकार, संवाद लेखन कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असून अभिनेता देवेंद्र चौगुले, स्वप्नील राजशेखर, नितीन कुलकर्णी आणि अभिनेत्री प्रियंका यादव यांच्या प्रकट मुलाखती होणार आहेत.तर भालकर्स कला अकादमींच्या सर्व कलाकारांचा यशवंत भालकर यांच्या निवडक चित्रपटातील गीतांवर नृत्यवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रकांळ्यावर वृक्षलागवड कार्यक्रम ही घेण्यात येणार असल्याचे संग्राम भालकर यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला संदीप भालकर, भालकर्स कला अकादमीचे सहाय्यक नृत्यदिग्दर्शक निशा शहापूरे,राहूल जाधव,ऐश्वर्या टोणपे,उमेश चौगुले,ओंकार शेटे,विजय कांबळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *