ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

कोल्हापूरात विंग्स् पब्लिक चॅरिटेबलची दंत वैद्यकीय सेवा उपलब्ध :सुहास भगत

कोल्हापूर /प्रतिनिधी : आरोग्य प्रबोधन आणि दतं उपचार क्षेत्रात कार्यरत विंग्स् पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रात कार्यक्षेत्र विस्तार केला आहे , त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुहास भगत , उपाध्यक्षा डॉ. सई भगत यांनी केले आहे . मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दाभोळकर कॉर्नर समोरील पादचारी पुलाजवळ , राही ट्रॅव्हल्सच्या जवळ अद्यायवत यंत्रणेसह कोल्हापूरातील युनिट सुरू झाले आहे .येथे डेंटीस्ट दिपाली केंद्रे या पाहणीसह मार्गदर्शन आणि उपचार करणार आहेत . येथे सामाजिक बांधिलकीतून रुट कॅनेल उपचार मोफत केले जाणार आहेत. तर दांतामध्ये सिंमेट ,चांदी भरणे , क्लिनिंग , कवळी बसविणे ( इंनप्लान्ट ) , कॅप बसवणे , वेडेवाकडे दात सरळ करणे आदि उपचार ही माफक दरात केले जाणार आहेत . विशेष म्हणजे या दंत उपचार क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉ .पल्लवी मोरे ( अर्थो ) – डॉ . मोहसीन रेझा ( रुट् केनेल ) -डॉ . प्रभु राजसिंग ( इंनप्लान्ट ) हे सुद्धा गरजेनुसार व्हिजीटींग डॉक्टर म्हणून उपलब्ध असणार आहेत . विंग्स् ने सामाजिक बांधिलकी जपत , रत्नागिरीत गत साडेपाच वर्षात चौतीस हजाराहून अधिक जणावर उपचार केले आहेत .तर अनेक महाआरोग्य शिबीरामधून मौखिक उपचारासाठी प्रबोधन ही केले आहे .कोल्हापूर पंचक्रोशीतही यांचा लाभ घेण्यासाठी , व्याख्याने – दंत आरोग्य शिबीरासाठी महिला बचत गट , विविध सामाजिक संस्था , प्रशाला , ज्येष्ठ नागरिक संघ यांनी 7776911222 या मोबाईल नंबरवर थेट संपर्क साधावा .असे आहवानही विंग्स् पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आल आहे ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *