कोल्हापूरात शिवसेनेचे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात लक्ष्मीपूजन आंदोलन

कोल्हापूर/प्रतिनिधी :
कोल्हापूरात शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील गेले ३ते४ वर्षापासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या मोटर पंपांची वीज कनेक्शन त्वरीत जोडण्यात यावीत. या प्रमुख मागण्यांसाठी आज ताराबाई पार्क येथील वीज वितरण कार्यालयात अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन आंदोलन करण्यात आले.दरम्यान आंदोलकांनी कार्यालयात प्रतिकात्मक पैशाच पाकीट ठेऊन लक्ष्मीपूजनाद्वारे लाचखोर अधिकाऱ्यांचा जाहीर केला .जिल्ह्यातील सुमारे पाच ते सह हजार शेतकऱ्यांच्या पैसे भरुनही ३ते४ वर्षांपासून मोठ्या शेती पंपांच्या वीज कनेक्शन जोडणे प्रलंबित आहेत.तर महावितरण कंपनीने मोठा गाजावाजा करत उच्चदाब वितरण प्रणालीतून तातडीने जोडणी देणार असल्याच जाहीर केले आणि विद्युत लोकपाल यांनी २६ आँक्टोबर २०१८ च्या दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली.त्यामुळे शिवसेनेच्यावतीने भटजी आणून पैशांनी भरलेली थैली तसेच कलश पूजन करून राज्य वीज वितरण कंपनीच्या लाचखोर अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवत अनोख्या पद्धतीने लक्ष्मीपूजन आंदोलन करण्यात आले. तर आंदोलकांनी वीज वीतरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज कनेक्शन देताना पैसे मागितले जातात.असा आरोप करत चांगलेच धारेवर धरले.दरम्यान
मुख्य अभियंता अनिल भोसले यांनी उच्चदाब वितरण प्रणाली लवकरच सुरू करणार असून ट्रान्सफर्म उपलब्ध नसल्यामुळे वीज कनेक्शन जोडणीस विलंब होत आहे.मात्र मार्च २०२०पर्यंत प्रलंबित वीज कनेक्शन जोडण्यात येतील असे आश्वासन आंदोलकांना दिले.
आंदोलनात
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे,प्रा शिवाजीराव पाटील,सुजित चव्हाण,विराज पाटील,दुर्गेश लिंगर्स,तानाजी आंग्रे,महिला संघटक शुभांगी पोवार यांच्यासह शिवसैनिक तसेच शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *