ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

कोल्हापूरात मुक्ताई प्रकाशन सखे गं सये तर्फे १४ मार्चला सई सम्राज्ञी पुरस्कार २०१९ चे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात मुक्ताई प्रकाशन सखे गं सये च्या वतीने दिं.१४ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी १० वा.विविध क्षेत्रात कर्तृत्वाने समाजात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या ,अंखड प्रेरणास्रोत बनलेल्या आणि आपल्या सोबतच अनेकांचे जीवन सुखमय बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सन्मानीय संखीच्या कर्तृत्वाचा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अवधूत चिकोडी व सौ.सई चिकोडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुक्ताई प्रकाशन च्या सखे गं सये मासिकाचे प्रकाशन सन२०१४ च्या दिवाळी अंकापासून होते. या मासिकाद्वारे स्री सक्षमीकरण व स्रीसशक्तीकरणासोबतच विविध उपयुक्त सदरे असणाऱ्या या मासिकाचे उदिष्ट वाचन संस्कृती आणि साहित्य संस्कृती जपणेही आहे. सखे गं सये या मासिकाच्या माध्यमातून अनेक विशेषांकांची वाचकांना पर्वणी च दिली जाते.तर व्यासंग या परिक्षेत्राखाली समृद्ध आणि प्रगल्भ अशा आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमातून प्रयत्नशील राहण्याचा संकल्प असून समाजातील विविध उपयुक्त विषयावर जसे अर्थकारण पर्यटन, शिक्षण, करिअर मार्गदर्शन केले जाते. तर मराठी वाचन व लिखाणासाठी प्रोत्साहित केले जाते.
या कार्यक्रमात संशोधन ,शिक्षण, समाजकार्य ,उद्योग ,लेखन ,प्रशासकीय सेवा ,कला ,फँशन अशा कार्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या १० महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. या महिलांच्या प्रेरक यशोगाथेतून महिलांना प्रेरणा देणे हे प्रमुख उदिष्ट आहे. हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती असणार आहे. तर कार्यक्रमात स्री सशक्तीकरणासोबतच स्वयंम शाळा,सायबरच्या एम.एस.डब्लू च्या विद्यार्थ्यांचा ही सहभाग असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *