कोल्हापूरात भगवान क्रिएशनतर्फे ७ व ८ जूनला “कोल्हापूर राष्ट्रीय शाँर्ट फिल्म फेस्टिव्हल २०१९”चे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरात भगवान क्रियेशन च्या वतीने चित्रपती व्ही. शांताराम स्मरणार्थ “कोल्हापूर राष्ट्रीय लघुपट महोत्सव – २०१९ चे (राष्ट्रीय शाँर्ट फिल्म फेस्टिव्हल) शाहू स्मारक भवनमध्ये दिं.७ व ८ जून रोजी आयोजन करण्यात आलय. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून जिल्ह्यातील चित्रपट,फिल्म प्रेमींनी या शाँर्ट फिल्म फेस्टिव्हलचा लाभ घेण्याच आवाहन मुख्य आयोजक – सिने-नाट्य अभिनेता महादेव साळोखे यांनी पत्रकार परिषदेत केलय. फेस्टिव्हलचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून मागील वर्षी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त या फेस्टिवल चे आयोजन करण्यात आल होतं.
मागील महोत्सव मध्ये देशभरातून विक्रमी ९२६ लघुपट आले होते.कोल्हापूर कलानगरी असून चित्रपट निर्मिती आणि अभिनयाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात कोल्हापूरचा स्वतंत्र ठसा आहे. केवळ मराठी चित्रपटच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीतही कोल्हापूरची स्वतंत्र ओळख आहे. म्हणून आजवर अनेक चित्रपटांचे येथे चित्रीकरण झाल्याचा इतिहास आहे.
लघुपट सुध्दा वेगळी व आव्हानात्मक कला आहे. अगदी थोडक्या वेळात, थोडक्या शब्दात अचूक संदेश देत, अचुक परिणाम साधणारी ही फिल्म बनवणे एक वेगळेच आव्हानात्मक कौशल्य आहे. याच कौशल्याचे परिणाम मोजणारी आणि नवकलाकार उभारत्यांना स्थान निर्मिती साठी हा फेस्टिवल महत्त्वाचा आहे. यावर्षी देशभरातून दिल्ली, जयपूर (राजस्थान), हरियाणा, गुजरात, पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक, तेलंगाणा आणि महाराष्ट्रातुन प्रत्येक शहरातून लघुपट आले असून कोल्हापूर मधून 20 शॉर्ट फिल्म आल्या आहेत. त्यातून 80 वेगवेगळ्या विषयांची निवड करून लघुपटांना प्रवेश देण्यात आले. परीक्षकांनी ८0 मधून २५ अव्वल दर्जाचे लघुपट प्रत्यक्ष स्क्रीनवर दाखवण्यासाठी निवड केलीय.तर सामाजिक संवेदना, विविध संदेश प्रसारित करण्याचा ही उद्देश या लघुपट महोत्सवात ठेवण्यात आला आहे. यामध्ये प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि संस्थानी भाग घेतला आहे.त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक व मराठी चित्रपट महामंडळ चे माजी उपाध्यक्ष सतिश रणदिवे जेष्ठ दिग्दर्शक पितांबर काळे, व निर्मात्या सौ. स्मिता चव्हाण यांनी या महोत्सवाचे परिक्षण केले आहे. तर प्रायोजक म्हणून चित्रपट निर्माता व उद्योगपती रावसाहेब वंदूरे, कलाप्रेमी व उद्योगपती मिलिंद शिंदे , उद्योगपती सादिक मुल्लानी, चित्रपट निर्माता अभयकुमार , रुपेश जाधव, वामाज , फूड पार्टनर म्हणून हॉटेल संस्कृती आहेत.
या फेस्टिव्हल मध्ये विशेष उपस्थित निर्माते अशोक नारकर, दिग्दर्शक विजू माने, अभिनेते मंगेश देसाई व सुशांत शेलार, सुजित भाऊ चव्हाण ,दिग्दर्शक गिरीश मोहिते, निर्माते व अभिनेते देवेंद्र चौगुले, अभिनेते स्वप्निल राजशेखर,दिग्दर्शक अजय कुरणे, रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री संजीवनी पाटील यांची असणार आहे. दरम्यान सत्कारमूर्ती – आमदार सुरेशराव हाळवणकर यांचा सत्कार करण्यात येणार असून विशेष पुरस्कारम्हणून व्ही. शांताराम स्मरणार्थ डॉ.मन्सूर यांना कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरनिर्माते अभयकुमार यांना कोल्हापूर कला गौरव पुरस्कार व सौ. स्मिता बुगड यांना कोल्हापूर नारी गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेचविशेष सत्कार – मिसेस सौन्दर्यवती शैलजा डुणूग आणि पोलंड देशात वार्सा या शहरात भरत नाट्यम कार्यक्रमाचे विशेष आयोजन केलेबद्दल सिनेअभिनेत्री अपेक्षा मुंदरगी काशीकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तरविजेत्या शॉर्ट फिल्म्सना सन्माननीय मानाची ट्रॉफी बक्षिसे स्वरूपात असेल. सहभागी फिल्म्सना सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.
यामध्ये मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर मधील जेष्ठ कलाकार उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला भगवान क्रियशनच्या सौ. मोक्षा साळोखे, शांकी साळोखे, सतीश बिडकर, रणजित जाधव,अमर मोरे,रवि झोरे, काशीकर,राजश्री पंडित, अभय मोहिते, किरण जेजुरकर, प्रसाद नरुले, आकाश कुलकर्णी, कौस्तुभ माईणकर, प्रीती जोकरे,सुभाष गुंदेशा, सुरेंद्र झुरळे, ज्युनिअर धुमाळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!