कोल्हापूरात इ- चलनाचा दणका:पेंडीग २३ केसेस वर झाली दंडात्मक कारवाई

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात वाहतूकीस अडथळा करणाऱ्या एका खाजगी आराम बसवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने इ-चलनाद्वारे कारवाई करून मागील २३ केसेससह चालू १ केसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.त्यामुळे इ-चलन प्रणालीचा पेंडीग केससच्या दंडाची वसूली करण्यात उपयोग झाल्याच पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितलं.
कोल्हापूरात वाहन कायद्याच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नुकतेच पावती पुस्तक बंद होऊन “एक राज्य एक इ चलन प्रणाली”सुरू करण्यात आली. दरम्यान माळकर सिग्नल चौक येथे एक खाजगी आराम बस (क्रं -एम एच ०४- जी.पी. २३५६) वाहतूकीस अडथळा करत असल्याचे निदर्शनास येताच वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीन ई- चलन द्वारे कारवाई केली असता सदर वाहनावर २३ केसेस पेंडीग असल्याचे दिसून आले.त्यामुळे पेंडीग २३ केसेस व चालू केस १ याप्रमाणे २४ केसेस चा एकुण ४८००/-रू दंडाची रक्कम भरून घेऊन कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *