कोल्हापूरात छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम

कोल्हापूर /कोल्हापूर
निसर्गासह आरोग्याचा समतोल राखण्यासाठी समाजातील सर्वांनी स्वच्छतेची कास धरावी. असे आवाहन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.कोल्हापूरात छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त ताराबाई उद्यान येथे “स्वच्छता हीच सेवा” या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी बोलत होते. स्वच्छता हीच सेवा” या मोहिमेअंतर्गत आज सकाळी ७ते ८.३० पर्यंत महापालिकेच्या ताराबाई उद्यान येथे श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये ताराबाई उद्यानाची तसेच बागे सभोवतालची स्वच्छता करणेत आली. या माहिमेमध्ये महापालिकेच्या अधिकारी/कर्मचा-यांनी सहभाग घेतला. तसेच ताराबाई उद्यानामध्ये उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी नागरीकांनीही उत्फुर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित नागरीकांनी ताराबाई उद्यानांविषयी बाजू मांडून महापालिकेने अशाच प्रकारे सर्व उद्यानांची स्वच्छता सेवा मोहिम राबवावी व उद्यानांनमधील कमतरतांची पुर्तता करुन घेणेसाठी नागरीकांचाही सहभाग घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. तसेच सर्वांनी शहर स्वच्छ ठेवणेची शपथ वाहिली.
यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबळे, कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, संजय नागरगोजे, नारायण भोसले, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, विभागीय आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, आरोग्य, पवडी, बागा विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, जेष्ठ नागरीकांसस महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *