कोल्हापूरात आम आदमी पार्टीचा महाडिक ,शेट्टींना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर/प्रतिनिधी
मोदी सरकारने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर मते मागून देशातील नागरिकांना अच्छे दिन आणण्याचे स्वप्न दाखवले होते. मात्र निवडून आल्यानंतर अच्छे दिनाचे स्वप्न हे दिवास्वप्न राहिले असून फक्त सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्याच काम हे मोदी सरकारने केल आहे. तर नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून विदेशातील काळा पैसा १०० दिवसात परत आणू अशी घोषणा केलेल्या मोदी सरकारने नोटाबंदीतून सर्व काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग मोकळा केला. गेल्या पाच वर्षात मोदी सरकार फक्त जनतेची फसवणूक करत आले आहे. त्यामुळे भाजप-सेनेला पराभूत करण्यासाठी देशात आम आदमी पार्टी भाजपविरोधी उमेदवाराला पाठिंबा देत असून कोल्हापूरात हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी आणि कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना आम आदमी पार्टीचा जाहीर पाठिंबा देत असल्याच कोल्हापूर लोकसभा प्रमुख संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितल.
भारतीय संघराज्य या संकल्पनेला तडा जाईल असे काम मोदी सरकार सातत्यान करत आल असून देशातील संविधानिक संस्थाची गळचेपी करण्याच एक कलमी कार्यक्रम मोदी सरकार राबवत असल्याच संदीप देसाई यांनी सांगितले.तसेच जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याच काम देशपातळीवर केल जात आहे. २०१४च्या लोकसभा निवडणूकीवेळी जाहीर करण्यात आलेल्या आश्वासनाची खैरात करण्यात आली असून सर्वसामान्य जनतेची फक्त फसवणूक करण्याच काम मोदी सरकार वारंवार करत आहे.मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर लोकशाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणार असून कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक आणि हातकणंगले मतदारसंघातील महाआघाडीचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.त्यामुळे महाडिक -शेट्टींना निवडून आणण्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्ते कामाला लागले असल्याच संदीप देसाई यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितल.
पत्रकार परिषदेला हातकणंगले लोकसभा उपाध्यक्ष सुदर्शन कदम,निलेश रेडेकर, जिल्हा सचिव जयवंत पोवार, कोल्हापूर लोकसभा उपाध्यक्ष लखन काझी, इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष कृष्णा काणेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *