कोल्हापूरच्या जयंती नाल्याने श्रमदानातून घेतला मोकळा श्वास

कोल्हापूर ता.05 : कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियोजित केले प्रमाणे कोल्हापूर शहरातून वाहणारा जयंती नाला हॉकी स्टेडियम ते सिध्दार्थ नगर पर्यत महापालिकेच्या आरोग्य विभागाबरोबरच इतर सर्व विभागाच्या सहकार्याने तसेच स्वयंसेवी संस्था, नागरीक यांचे सहभागाने शहर सफाईचा तथा स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर सत्त्यात उतरविणेचा ध्यास आयुक्त हे कोल्हापूर महानगरपालिकेकडे रुजु झालेपासून घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.05 मार्च 2019 रोजी स.7.00 वाजता कोल्हापूर शहर मध्यवस्तितून वाहणारा जयंती नाला हॉकी स्टेडियम ते सिध्दार्थनगर पर्यंत स्वच्छ करणेचा शुभारंभ हॉकी स्टेडियम येथे महापौर सौ.सरीता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेविका सौ.ललिता बारामते, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्या उपस्थितीत शुभारंभ करणेत आला.
यावेळी प्रत्यक्षात नाल्यामध्ये उतरुन नाल्यामधील प्लॅस्टिक काचेच्या बाटल्या, पिशव्या, झाडांच्या फांदया बाहेर काढल्या गेल्या. त्याचबरोबर नाल्याच्या दोन्हीं बाजूस जमा झालेला कचरा उठाव करणेत आला. यावेळी रेडिओ सिटी कोल्हापूर यांनी महापौर यांची मुलाखत घेऊन नाला स्वच्छतेसाठीचा संदेश देऊन आपलाही सहभाग नोंदवला.जयंती नाला स्वच्छतेसाठी नियंत्रण अधिकारी यांच्या देखरेखे खाली जयंती नाल्याच्या पाच विभागामध्ये हॉकी स्टेडीअम ते सावित्रीबाई फुले रुग्णालय, सावित्रीबाई फुले रुग्णालय ते लक्ष्मीपूरी , लक्ष्मीपूरी ते आयर्विन ब्रिज, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, पंप हाऊस ते सिध्दार्थनगर अशी पाच पथके तयार करणेत आली जयंती नाला कचरामुक्त करणेचा मानस ठेवणेत आला होता. यावेळी जयंती नाला सफाई वेळी निघालेला एकूण 10 डंपर कचरा उठाव करणेत आला.
सावित्रीबाई फुले रुग्णालय ते लक्ष्मीपूरी पर्यत जयंती नाला सफाईचे कामामध्ये नियंत्रन अधिकारी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, विभागिय कार्यालय क्र. 2 कडील उपशहर अभियंता एस के माने व अधिकारी/कर्मचारी, आरोग्य विभाग, अन्य विभागाकडील एकूण 200 कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी डंपर 2 , जेसीबी 1, याचे सहाय्याने कचरा उठाव करणेत आला. यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने नाल्यामधील कचरा उचलणेत आला. तसेच लक्ष्मीपूरी ते आयर्विन ब्रिज पर्यत जयंती नाला सफाई चे कामामध्ये नियंत्रन अधिकारी उप आयुक्त मंगेश शिंदे, विभागिय कार्यालय क्र. 3 कडील उपशहर अभियंता आर के जाधव, घरफाळा विभागाकडील 60 कर्मचारी, नगरसचिव विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, आरोग्यविभागा व अन्य विभागाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला. आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस जयंती नाला सफाई चे कामामध्ये नियंत्रन अधिकारी अति.आयुक्त श्रीधर पाटणकर, पर्यावरण विभागाकडील समीर व्याघ्राबंरे, अधिकारी/कर्मचारी, आरोग्यविभागाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला. पंप हाऊस ते सिध्दार्थनगर पर्यत जयंती नाला सफाई चे कामामध्ये नियंत्रन अधिकारी जल अभियंता सुरेश कुलकर्णी, विभागिय कार्यालय क्र. 4 उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, अधिकारी/कर्मचारी, ड्रेनेज, बोअरिंग, बाग विभाग, आरोग्यविभागाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या मोहिमेमध्ये शहरातील क्रिडाई संस्थेचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, रवी माने, प्रदीप भारमल, संदीप मिरजकर, गणेश सावंत, महेश पोवार, बिलाल तहसिलदार, आर्किटेक्ट आसोसिएशनेच अध्यक्ष अजय कोराणे, विजय चोपदार, उमेश कुंभार, अनिल घाटगे, प्रशांत काटे, वंदना पुष्कर, प्रमोद पोवार यासह पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, अनिल चौगुले, फेरिवाला संघटनेचे दिलीप पोवार यांनी सक्रिय सहभाग घेऊन आवश्यक त्या सुचना कार्यकर्ते व कर्मचारी यांना दिल्या.
या मोहिमेमध्ये आयुक्त यांच्या पत्नी तसेच आर्किटेक्चर अमरजा निंबाळकर, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची उपस्थितीत जयंती नाला दसरा चौक या परिसरातील स्वच्छता घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्मोकॉल, काचेच्या बाटल्या, पाण्यामध्ये न विरघळणारे साहित्य बघता बघता एकत्रित करण्यात आले.
आजच्या या मोहिमेमध्ये सौ.संयोगिताराजे छत्रपती या आपल्या प्रमुख कार्यकर्तेसह सहभागी झाल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्षात प्लॅस्टिक गोळा करुन सर्वांना आयुक्त व कार्यकारी अधिकारी, महापौर यांचे समवेत शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेऊन पुढील नियोजनामध्ये यापेक्षा मोठी कामगिरी कोल्हापूर शहरवासीयांचेकडून करता येईल अशी चर्चा केली. आजच्या मोहिमेमध्ये मराठा मावळा या संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.महापौर सौ.सरीता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे यांनी महापालिकेच्यावतीने निजोजित केलेल्या पाचही ठिकाणी भेटी देऊन सहभागी अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहीत केले. तसेच त्यांना धन्यवादही दिले. त्याचबरोबर शाहूपूरीमधील ओढयालगत राहणाऱ्या नागरीकांना ओढयामध्ये कचरा टाकू नये व टाकताना कोणी आढळल्यास महापालिकेस कळवावे अशी विनंती केली.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपण शहर स्वच्छतेचा घेतलेला ध्यास यास कोल्हापूर वासीयांनी मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व उपस्थितांचे धन्यवाद मानून पुढील कार्यतही असाच सहभाग नोंदवावा अशी विनंती केली. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी यांना वेळोवेळी याकडे गांभिर्याने लक्ष देऊन स्वच्छ व सुंदर कोल्हापूर करण्याकडे सर्वांनी जानिव पुर्वक लक्ष दयावे असे नमुद केले. त्याचप्रमाणे ओढया लगतच्या भागामध्ये पानकणिस, कर्दळी, आळू यासारख्या वनस्पती लावण्यासाठी नियोजन करावे असे नियंत्रण अधिकारी यांना सुचित केले.
यावेळी गटनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक ईश्वर परमार, अजित ठाणेकर, संजय मोहिते, राजाराम गायकवाड, शेखर कुसाळे, अभिजीत चव्हाण, दिलीप पोवार, नगरसेविका सौ.पुजा नाईकनवरे, सौ.ललिता बारामते, सौ.उमा बनछोडे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उप-आयुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, प्रदुर्षण नियंत्रण मंडळाचे अधिकरी संजय मोरे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगरसचिव दिवाकर कारंडे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, मुख्य आरोगय निरिक्षक डॉ.विजय पाटील, पर्यावरण अभियंता आर के पाटील, समिर व्याघ्रांबरे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस.के.माने, आर.के.जाधव, हर्षजित घाटगे, उपजल अभियंता रामदास गायकवाड, सर्व आरोग्य निरिक्षक, केआयटी कॉलेज गोकुळ शिरगाव 5 शिक्षक, शिवाजी विद्यापीठ Techoloji department 25 विद्यार्थी, शाहुपूरी येथील क्रिडाई संस्थेचे 10 पदाधिकारी/कर्मचारी, आसोसिएट्स ऑफ आर्किटेक ऍ़न्ड इंजिनियरिंगचे 12 सदस्य, पाचगाव येथील शिवबा मावळा संघटनेचे सुमारे 9 पदाधिकारी, आरोग्य, बागा, पवडी, घरफाळा, अग्निशम, नगरसचिव, प्राथमिक शिक्षण मंडळ, पाणी पुरवठा, ड्रेनेज, प्रकल्प, कार्यकारी अभियंता, वर्कशॉपमधील सुमारे 2500 अधिकारी/कर्मचारी, स्वयंसंस्थेचे कार्यकर्ते, नागरीक यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!