ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

कोल्हापूर महापालिकेतर्फे धर्मवीर छ.संभाजीराजे जयंती उत्साहात

कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूरात महानगरपालिकेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळयास महापौर सौ.सरीता मोरे व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, गटनेता सत्यजित कदम, नगरसेविका सौ.उमा इंगळे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, उदय इंगळे, संभाजी ब्रिगेड, शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *